Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

HSC 12th result : आज निकाल, पण बारावीनंतर काय करायचे? जास्त पगारासाठी कोणता कोर्स करावा, घ्या जाणून

HSC 12th result 2025 today know which courses to take for higher salary after 12th : राज्यात आज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षेच्या निकालासंदर्भात महाराष्ट्र शिक्षण मंडळाने मोठी घोषणा केली आहे. आज दुपारी बारावीचा निकाल लागणार आहे. पण बारावी पास झालो आता पुढे काय करायचे हे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी ठरवलेले नाही अथवा ते ठरवायचे असते.

..म्हणूनच आम्ही बारावीनंतर काय काय करता येईल आणि जास्त पगाराचे कोर्सेस करुन पैसा कसा मिळवता येईल यासंदर्भातील कोर्सेसची माहिती देत आहोत.

HSC 12th result

अनेक विद्यार्थ्यांना बारावीनंतर पुढे शिक्षणापेक्षा आर्थिक स्थिती पाहून काम करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, अशा विद्यार्थ्यांना कोर्स करुन चांगली नोकरी मिळू शकते, आणि असे काही कोर्सेस करत करत शिक्षणही पुढे चालू ठेवता येऊ शकते.चला जाणून घेऊया, बारावीनंतर कोणकोणते कोर्सेस आपल्याला करता येईल ..

बॅचलर ऑफ टेक्नाॅलाॅजी बी. टेक

अभियांत्रिकी क्षेत्रात करीअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आयटी, संगणक विज्ञान, इलेक्ट्राॅनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, नॅनो टेक्नाॅलाॅजी, केमीकल टेक्नाॅलाॅजी आदी कोर्सेस तुम्ही केल्यास तुम्हाला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळु शकेल.

बी. एसस्सी इन सीएस अर्थात कम्युटर सायन्स

या निगडीत अनेक कोर्सेस आहेत, त्यात डेटाबेस, प्रोग्रामिंग भाषा, डेटाबेस व्यवस्थापन, साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट आदी कोर्सेस जर तुम्ही केले तर आयटी क्षेत्रात तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते.

बीएस्सीची निगडीत कोर्सेस

बीएस्सी फाॅरेन्सिक सायन्ससह तुम्ही बीएसस्सी नर्सिंग आदी कोर्सेस करु शकता, नर्सिंगनंतर वैद्यकीय क्षेत्रात मोठी संधी असते.

पॅरामेडीकल कोर्सेस

बारावीनंतर काही पॅरामेडीकल कोर्सेस आहेत जे वैद्यकीय क्षेत्रात महत्वाची असतात. उदा. सर्जरी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सोनोग्राफी मशीनशी निगडीत, दंत सौंदर्यशास्त्राशी निगडीत कोर्सेस आहेत याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणे आणि सहाय्यक म्हणून अनेक कोर्सेस करता येईल.

फार्मसीमध्ये करीअर

वैद्यकीय क्षेत्रात आज फार्मसी हे क्षेत्र खूपच महत्वपूर्ण मानले जाते कारण जोपर्यंत मानव आहेत तोपर्यंत औषधी लागणार त्यामुळे औषध निर्माता होता येईल. बारावीनंतर डी. फार्म आणि बी. फार्म हे कोर्सेस आहेत.

पायलट कसे होता येईल

बारावीनंतर पायलट ट्रेनिंग कोर्सेससाठी तुम्ही जाऊ शकता बारावी सायन्स जर तु्म्ही उत्तीर्ण असाल तर असे अभ्यासक्रम तुम्ही करु शकता.

बीए. फाईन आर्टस

बारावीनंतर आर्ट डायरेक्टर, चित्रकला शिक्षक, कार्टुनिस्ट, ग्राफीक डिझायनर, सेट डिझायनर, इंटेरियर डिझायनर, अॅनिमेटर, फिल्ममेकींग आदी कोर्सेस तु्म्ही करु शकता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+