Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

HSC 12th result 2025 today: आज बारावीचा निकाल! कोणकोणत्या वेबसाईटवर लागणार अन् कसा बघायचा जाणून घ्या

HSC 12th result 2025 today : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आता महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात एचएचसी, बारावीचा निकाल आज लागत आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता पाहायला मिळणार आहे.

मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल सर्वांना पाहता येणार आहे. त्यामुळे आता बारावी परिक्षेचा निकालही सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हा निकाल दुपारी एक वाजेपासून सर्वजण डाऊनलोड करु शकतात अथवा त्याची प्रिंट अन् स्क्रिन शाॅटही काढू शकतात.

HSC 12th result 2025 today

बारावीच्या परिक्षेचा निकाल कोणत्या वेबसाईट्सवर बघता येणार?

  • mahahsscboard.in
  • mahresult.nic.in
  • hscresult.mkcl.org
  • msbshse.co.in
  • mh-ssc.ac.in
  • sscboardpune.in
  • sscresult.mkcl.org
  • hsc.mahresults.org.in

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या वरील वेबसाईटवर बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपला बारावीचा निकाल आता पाहता येणार आहे.

असा बघा तुमचा निकाल

  • सर्वात आधी mahresult.nic.in ला भेट द्या.
  • त्यानंतर "महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025" लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा हजेरी नंबर आणि आईचे नाव (प्रवेशपत्रानुसार) त्यामध्ये भरा. "निकाल पहा" यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा महाराष्ट्र बोर्ड निकाल 2025 तुम्हाला दिसेल.
  • निकाल तुमचाच आहे का हे याची पडताळणी करा.
  • यानंतर
  • पुढच्या शैक्षणिक प्रक्रियेसाठी आणि भविष्यासाठी निकाल डाऊनलोड करा, स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही प्रिंटही काढू शकता.

किती विद्यार्थ्यांनी दिली होती परिक्षा?

राज्यभरातून 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. मुंबई विभागातून एकूण 3 लाख 42 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. वाणिज्य शाखेतून सर्वाधिक म्हणजेच एक लाख 66 हजारांवर विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. त्यानंतर विज्ञान शाखेच्या 1 लाख 27 हजार 704 विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या 47 हजार 879 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे बारावीची परीक्षा घेण्यात आली. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला होता. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती, काॅपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळाने मोहिमही राबवली होती.परीक्षेचा पेपर रिचेक करण्यासाठी मोठी सूचना

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वःतच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तर पत्रिकांच्या सत्यप्रती, पुर्नमुल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscbord.in वरुन किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती आणि सुचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

आपला पेपर रिचेक करण्यासाठी व उत्तरपत्रिकेची सत्यप्रत मिळवम्यासाठी 6 मे 2025 ते 20 मे 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीआय किंवा नेटबँकींग याद्वारे भरता येणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+