दुःखद बातमी : धुळवडीचा रंग धुण्यासाठी पाण्यात उतरलेल्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू; मुंबईतील घटना
महाराष्ट्रात होळी व धुलिवंदनाचा आनंद असतानाच, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रंग खेळून झाल्यानंतर तो रंग धुवून काढण्यासाठी नदीत उतरलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर येथे ही दुःखद घटना घडली. उल्हास नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने या चौघांचा बुडून मृत्यू झाला.

नेमके काय घडले?
धुळवड खेळल्यानंतर आर्यन मेदर (वय १५), आर्यन सिंग (वय १६), सिद्धार्थ सिंग (वय १६) आणि ओमसिंग तोमर (वय १५) हे चौघे विद्यार्थी रंग काढण्यासाठी उल्हास नदीत उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने या चौघांनीही जलसमाधी मिळाली. गटांगळ्या खात असताना ही गोष्ट इतरांच्या लक्षात आली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. बदलापूरच्या चामटोली परिसरात ही घटना घडली.
चारही मुले बदलापूरची
खोल पाण्याचा अंदाज न आल्याने आर्यन मेदर, आर्यन सिंग, सिद्धार्थ सिंग आणि ओमसिंग तोमर ही मुले पाण्यात बुडाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे चारही मुलं पोद्दार गृह संकुलातील रहिवासी होते. होळीनिमित्त धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी हे चारही मुलं आपल्या इतर मित्रांसोबत उल्हास नदीच्या काठावर आले. ते नदीत उतरले. मात्र त्यांना नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे.
अग्निशामक दलाची धाव
घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या मुलांचा शोध घेतला. मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आलं. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेने बदलापूर शहरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र सणाचा उत्साह असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. अंगाला लागलेला रंग धुण्यासाठी ही मुलं उल्हास नदीवर गेली होती. त्यांच्यासोबत इतरही काही मुलं होती. ही मुलं नदीत उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.












Click it and Unblock the Notifications