'होळीला सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालाल तर याद राखा', मुंबई पोलिसांचे होळी-रंगपंचमीसाठी कडक नियम!
Holi 2025 And Rangpanchami : मुंबई पोलिसांनी 2025 च्या होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी कडक नियमावली जारी केली आहे. 12 मार्च म्हणजेच आजपासून ते 18 मार्च 2025 पर्यंत हे नियम लागू असणार आहेत.
त्यामुळे होळी व रंगोत्सवाचा आनंद घेण्यापूर्वी ही बातमी अतिशय महत्त्वाची असणार आहे. एकीकडे रमजानचा महिना सुरु असल्याने मुंबई पोलिस आयुक्तांच्या वतीने एक पत्रक जारी करून नियमावली सांगण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रासह मुंबईत नेमकी काय नियमावली असणार आहे. तर कोणत्या गोष्टीवर निर्बंध असणार आहे.

होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी ही नियमावली?
- अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाणे लावण्यास मनाई.
- हावभाव किंवा नक्कलचा वापर आणि चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावते, अशा गोष्टी करू नये.
- पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे यांच्यावर होणार कारवाई.
- रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे आणि/किंवा फेकणे, यावर निर्बंध असणार आहे.
- होळी व रंगपंमी निमित्त जबरदस्ती वर्गणी मागणार्यांवरही होणार कारवाई
मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून एक प्रसिद्ध पत्रक जारी
मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून नुकतचं एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे. यात होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जारी केली आहे.
यानुसार, अश्लील शब्दातील गाणी गाण्यांवर प्रतिबंध असणार आहे. तसेच अनोळखी लोकांवर रंग किंवा पाणी फेकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासोबतच समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, अशी सूचना मुंबई पोलिसांनी दिली आहे.
रमजानचा महिना सुरू असल्याने मुंबई पोलिसाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी सण 12 मार्च 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत साजरा केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन घडू नये यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते.
रंगपंचमी हा होळीचा शेवटचा पर्व?
रंगपंचमी हा सण होळीचे शेवटचे पर्व मानले जाते. शास्त्रानुसार देवी-देवतांना समर्पित रंगपंचमीच्या या सणाला देव पंचमी असेही म्हणतात. कारण सर्व देव या दिवशी रंगोत्सव साजरा करतात अशी एक आख्यायिका आहे.
विविध रंगामुंळे वाईट गुणांचा नाश होतो आणि कुंडलीतील सर्व दोष नाहीशे होतत. या दिवशी देवी-देवता एकत्र होळी खेळतात तेव्हा सुख, समृद्धी आणि वैभवाचा आशीर्वाद देतात, असे मानले जाते.












Click it and Unblock the Notifications