Hingoli News : हिंगोलीत रक्तपात! जुन्या वादातून गोळीबार, बाप-लेक ठार, 2 गंभीर जखमी, हे आहे मोठे कारण
Hingoli bhandegaon firing two dead two injured land dispute : हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे जुन्या शेतीच्या वादातून एका कुटुंबावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना २३ सप्टेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली. भांडेगाव येथील रहिवासी बाबाराव जगताप आणि कुंडलिक जगताप यांच्यात गेल्या काही वर्षांपासून शेतीवरून वाद सुरू होता. या वादातून त्यांच्यात नेहमीच तणाव असायचा. मंगळवारी रात्री कुंडलिक जगताप आपल्या मुलाला, शिवराज जगताप, तसेच सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप यांना घेऊन बाबाराव जगताप यांच्या घरी गेले.
त्यावेळी बाबाराव जगताप यांनी आपल्या बंदुकीतून थेट त्यांच्यावर गोळीबार केला. यात कुंडलिक जगताप यांना तीन गोळ्या लागल्या, तर त्यांचा मुलगा शिवराज जगताप याच्या छातीवर गोळी लागली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप यांनाही गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेनंतर तातडीने जखमींना हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
शेतजमीनीचा वाद, रोजचीच कुरबूर
बाबाराव जगताप आणि कुंडलिक जगताप यांचा शेतजमीनीवरुन वाद होता. हा वाद वाढत गेला, रोजचीच कुरबुर होत असे, यातून दोन्ही कुटुंबिय कंटाळले होते, त्यातच त्यांचा वाद इतक्या विकोपाला गेला की, एकमेकांच्या जीवावर ही भाऊबंदकी उठली.
अशी घडली खुनाची घटना
जगताप कुटुंबियांचा शेतीचा वाद जुनाच होता, या वादानंतर २३ सप्टेंबरला ११ वाजेच्या सुमारास कुंडलिक हे त्यांचा मुलगा शिवराज जगताप, सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप यांना सोबत घेऊन बाबाराव जगताप यांच्या घरी गेले. तिथे त्यांनी दरवाजा ठोठावला. हे पाहून बाबाराव जगताप यांनी दरवाजा उघडला आणि त्यांनी दरवाजा उघडताच धाड्धाड् गोळ्या झाडल्या, या हल्ल्यात कुंडलिक जगताप यांना तीन गोळ्या लागल्याचे वृत्त आहे तर त्यांचा मुलगा शिवराज यांना छातीवर गोळी लागली. या दुर्दैवी हल्ल्यात दोघा बाप-लेकाचा मृत्यू झाला. ही घटना समजताच हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.












Click it and Unblock the Notifications