Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हिंदुत्ववादी सरकारचे हिंदूंसाठी निर्णय; धार्मिक स्थळांची सुधारणा आणि मंदिरांचे नूतनीकरण

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. हिंदुत्वाशी बांधिलकी म्हणून विविध हिंदू धार्मिक स्थळांच्या विकासाची तसेच ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे महायुती सरकारकडून करण्यात आली आहेत. भाषा आणि संस्कृती धोरणाच्या बाबतीतही राज्य सरकारने महत्त्वपूर्ण कामे केलेली आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या समितीकडे पाठपुरावा करून आणि आवश्यक ती कागदपत्रे आणि पुरावे सदर करून राज्य सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून घेतला. या माध्यमातून मराठी भाषेसाठी आणखी सुविधा सरकारला करता येणार आहेत.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी मान्यता मिळण्यासाठी भारत सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित 12 किल्ल्यांचे नामांकन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आठवण असलेल्या वाघनखांचे प्रदर्शन नुकतेच सातारा येथे आयोजित करण्यात आले होते. लंडनच्या संग्रहालयातून ही वाघनखे भारतात आणण्यात आली. हिंदू धर्म संस्कृतीचे अनुसार गाईला गोमाता म्हटले जाते. राज्य सरकारने गाईला राज्यमातेचा दर्जा देऊन व संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. देशी गाईंचा वंश आणि प्रजाती टिकून राहावी यासाठी सरकार विशेष प्रयत्नशील आहे.

Maharashtra Assembly Election 2024

रायगड परिसरात विकासकामे

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा किल्ला उभारला. रायगड किल्ला प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ला परिसरात अनेक कामे करून घेण्यात येत आहेत तसेच किल्ल्यावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महाड कडून रायगडला जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील बानुरगरड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे तर खानापूर तालुक्यातील रेवणसिद्ध मंदिराच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी रुपये सरकारने दिले आहेत. प्राचीन ऐतिहासिक वस्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांची शिक्षा आणि एक लाखाची दंडाची तरतूद करण्यात आली आहे. बौद्ध समाजातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांना दहा लाखापर्यंत अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे

कर्जत येथे श्री विठ्ठलाची ५२ फुटांची मूर्ती

रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर पट्ट्यात वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. एकूण रायगड जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या वारकऱ्यांपैकी बहुतांश वारकरी कर्जत खालापूर पट्ट्यात राहतात. येथे उल्हास नदीच्या काठी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून 52 फुटांची विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली आहे. तो स्थानिकांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे. ख्यातनाम निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने कर्जत येथे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे उभारण्यात आलेली शिवसृष्टी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज भवनासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

सिद्धिविनायक मंदिर परिसरात देणार सुधारणा

राज्यात विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष सुविधा निर्माण करण्यात महायुती सरकारने कोणतीही कसर ठेवलेली नाही. श्री सिद्धिविनायक हे मुंबईकर भाविकांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सौंदर्य करण्याच्या कामासाठी 500 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. या निधीमधून भाविकांसाठी निवास व्यवस्था वाहन तर दर्शन व्यवस्था भाविकांसाठी रांगा आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नांदेड मधील हनुमान मंदिर हे शहरातील हिंदू धर्मियांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे त्याच्या पुनर्विकासासाठी सरकारने भरीव निधी दिला असून नांदेडमध्ये अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक देखील उभारण्यात येत आहे.

विविध समाजांसाठी विकास महामंडळे

विविध समाजाचा विचार करून त्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील अनेक आयटीआय महाविद्यालयांची नावे बदलण्यात आली असून त्या आयटीआय महाविद्यालयांना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध शक्तीपिठाला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरण रीजीजू यांनी या स्मारकाच्या कामाची पाहणी केली आहे. दहीहंडी या प्रकाराला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात वाचन संस्कृती आणि ग्रंथ चळवळ विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे

मराठवाड्यात विविध धार्मिक स्थळांच्या विकासासाठी शेकडो कोटींचा निधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी १४३४ कोटी रुपयांची भरीव तरतूद असलेल्या विविध योजना, प्रकल्प जाहीर केले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे गोदावरी काठावरच्या २०० देवस्थानांना जोडणारा सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग - २३४ कोटी रुपये, परभणी-गंगाखेड: संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी ५० कोटी रुपये. नांदेड: श्रीक्षेत्र माहूरगड शक्तीपीठाच्या सुधारीत विकास आराखड्यासाठी ८२९ कोटी १३ लाख रुपये. हिंगोली: श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४५ कोटी १४ लाख रुपये. धाराशिव: सोनारी भैरवनाथ देवस्थान आणि परांडा येथील विकास आराखड्यासाठी १८६ कोटी रुपये. याप्रमाणे प्रकल्पांसाठी निधी मंजूर करण्यात आलाय.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+