मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस तर राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
मुंबई : राज्यात पावसाने काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालं आहे. मुंबई आणि परिसरात आज पहाटेपासून पाऊसला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अंधेरी, विरार, भाईंदर, ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईमध्ये सगळीकडेच मुसळधार पाऊस सुरू आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
राज्यात पुढील 4-5 दिवस असाच जोरदार पाऊस राहिला असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावासाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर काल रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवस पावसाने दडी मारल्याने उकाड्याने प्रमाण देखील वाढले होते. मात्र काल रात्री पासून सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळतोय .सिंधुदुर्गात आज पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढणार आहे.छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात जोरदार पावासाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती,गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार या जिह्याला सुध्दा पावासाचा इशारा देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications