राज्यात पावसाचा कहर, पुराचा पहिला बळी
मुंबई- काल मुंबईसह उपनगराला झोपल्यानंतर आजही पावसाने राज्यात ठिकठिकाणी दमदार हजेरी लावली. आज हवामान खात्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यात यलो अलर्ट दिला.
रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे जळगाव येथील नाल्याला आलेल्या पुरात सहा वर्षीय चिमुकला वाहून गेल्याची घटना घडली आहे.

काल दमदार हजेरी लावल्यानंतर आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु रविवारी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही धोक्याच्या पातळीवर आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, अर्जुना, कोदावली, शास्त्री, मुचकुंदी नदी इशारा पातळीवर आली आहे. चांदेराई बाजारपेठेतील पाणी ओसरले आहे. हवामान विभागाचा आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
सोमवारी सुद्धा हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी देखील साचले आहे.
झोपडपट्टीत घरात शिरले पाणी
मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील आंबोली सिजर रोड परिसरातील झोपडपट्टीतील अनेक घरात पाणी शिरले. यामुळे रविवारी मध्यरात्री झोपेत असलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
गटाराचे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरातील सामान देखील पाण्यामुळे भिजून गेले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या नुकसानीचा सामना देखील करावा लागत आहे. मुसळधार पावसानंतर कांदिवली गावात पाणी तुंबले आहे. कांदिवली गावात अनेक वाहने पाण्याखाली बुडाली आहेत.
चिमुकला वाहून गेला
जळगाव शहरातील खंडेराव नगरात नाल्यात चेंडू घेण्यासाठी उतरलेल्या सहा वर्षीय चिमुकला हा पुराच्या पाण्यात वाहून गेला. या मुलाचा मृतदेह रविवारी राष्ट्रीय महामार्गावरील पोद्दार शाळेजवळील नाल्याजवळ अडकलेला आढळून आला.
सचिन राहुल पवार (वय ६, रा.हरी विठ्ठल नगर, जळगाव) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications