Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्रेमं करणं सोप्पय पण प्रेमविवाहाचं काय? प्रेमविवाहाचं स्वप्न पूर्ण करणारा माणूस

Valentines day 2025 : व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला की प्रेमाच्या चर्चांना उधाण येतं. दरवेळी व्हॅलेंटाईन म्हटलं की तरुणांच्या प्रतिक्रिया घेणं आलाच पण या वर्षी नवीन काय करता येईल याच्या शोधात आम्ही होतो आणि अचानक आठवलं ते 'राईट तू लव्ह' च फेसबुक अकाऊंट.

'राईट टू लव्ह' एक अशी संस्था जी अश्या जोडप्यांना मदत करते. ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, लग्न करायचंय पण आई-वडील आणि समाज जात किंवा आणखीन कोणत्या वेगळ्या कारणाने या गोष्टीला मान्यता देत नाही.

happy valentine day

'राईट टू लव्ह' या संस्थेमार्फत अश्या प्रेमात हताश-निराश झालेल्या जोडप्यानं मार्गदर्शन करून त्यांना त्यांचा संवैधानिक अधिकार समजावून सांगून सल्ला आणि पाठिंबा दिला जातो. आत्तापर्यंत या संस्थेने 200 हुन अधिक आंतरजातीय विवाह संपन्न करून दिले आहेत.

फेब्रुवारी 2015 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती आणि या फेब्रुवारीत संस्था 10 वर्ष पूर्ण करत आहे. याच अनुषंगाने संस्थेचे संस्थापक अभिजित .के यांची वन इंडिया मराठीने मुलाखत घेतली. या मुलाखतीत अभिजित यांनी संस्था कशी सुरु झाली इथपासून ते आताच्या काळात प्रेमाच्या व्याख्या कश्या बदलत चालल्या आहे यावरसुद्धा भाष्य केलंय.

'राईट टू लव्ह' चळवळ उभारण्याचं कारण

2015 मध्ये अभिजित.के यांच्या एका मित्राला आंतरजातीय मुलीवर प्रेम होतं म्हणून खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. त्याची अशी अवस्था बघून अभिजित आणि त्यांच्या काही मित्रांनी ही चळवळ सुरु केली. त्याद्वारे त्यांनी जोडप्यानं योग्य मार्गदर्शन करून त्यांचे हक्क समजावून सांगणं, त्यांना विश्वास देणं आणि ते जर संकटात असतील तर वेळप्रसंगी मदत करणं हे काम सुरु केलं.

मित्रांचा गोतावळा बराच असल्याने एकएक जण त्यात सहभागी होत गेला त्यात बऱ्याच वकिलांचा सुद्धा समावेश आहे. बघता बघता ही चळवळ इतकी मोठी बनली की तिला संस्था म्हणूनंच ओळखलं जाऊ लागलं. अगदी बाहेरच्या राज्यातली जोडपीसुद्धा मदत आणि मार्गदर्शनासाठी संपर्कात असतात..

जाता जात नाही ती 'जात'

पळून जाऊन लग्न करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे 'जात' असं अभिजित. के. यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. अजूनही आपल्या समाजात वेगळ्या जातीत लग्न करणं म्हणजे याला गुन्हा समजलं जातं. लोक कितीही शिकून पुढे गेले तरीही आंतरजातीय विवाहाकडे ते भुवया उंचावूनच बघतात आणि आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी आपल्या मुलाला किंवा मुलीला प्रेमाचा त्याग करायला भाग पाडतात. अजूनही समाज जातीच्या साखळदंडात इतका अडकला आहे की जग आता डिजिटल युगाकडे मार्गक्रमण करत आहे पण लोकांना 'जात' काही सोडायची नाही.

एक पळून आलेलं अनवाणी जोडपं

तुम्ही एवढ्या जोडप्यानं मार्गदर्शन आणि मदत करतात मग काही अनुभव सांगा असं विचारल्यावर अभिजित यांनी एका जोडप्याचा एक किस्सा सांगितलं. एक जोडपं घरातून पळून आलं होत त्यांना लग्न करायचं होत आणि अर्थातच घरातल्यांचा विरोध होता. तेव्हा त्यांना भेटल्यावर अभिजित यांच्या लक्षात आलं की मुलगा अनवाणीच आला आहे. त्यांनी विचारल्यावर मुलाने सांगितलं कि तिची चप्पल आमच्याकडून हरवली मग माझी तिने घातली आहे. अभिजित यांनी पुढे सांगितलं की मी अजूनही त्यांच्या संपर्कात आहे. त्यांचं लग्न झालं, सुखी संसार सुरु आहे आणि आज मुलगा इतक्या चांगल्या पदावर आहे की बायकोसाठी रोज नवीन सॅंडल विकत घेऊ शकतो.

जेन 'झी' आणि प्रेमाच्या बदलत्या व्याख्या

प्रेम या विषयावर बोलताना अभिजित यांनी सांगितलं 'की कालानुरून गोष्टी बदलत जाणं मान्य आहे पण 'प्रेम' या शब्दाचा अर्थच आताच्या या नवीन पिढीने बदलून ठेवलाय. एकमेकांसोबत वेळ घालवणं, फिरणं म्हणजे याना प्रेम वाटतं. पण प्रेम ही फार गंभीर आणि कालांतराने, वेळ घेऊन होणारी गोष्ट आहे.

प्रेम व्हायला ते फुलायला आणि विश्वास संपादन करायला वेळ लागतो पण तो वेळ बहुतेक या नवीन पिढीकडे नसावा. शिवाय सोशल मीडियाच्या ट्रेंड्सप्रमाणे हे लोकं प्रेमाच्या व्याख्या बदलतात.' एकंदरीत प्रेमाशी संबंधित सर्व विषयावर अभिजित. के यांची संपूर्ण मुलाखत आम्ही घेतली आहे. ही संपूर्ण मुलाखत पाहायची असल्यास तुम्ही वनइंडिया मराठी या आमच्या यु ट्यूब चॅनलवर ती पाहू शकता..

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+