Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सावधान... पुण्यात GBS आजाराचे रुग्ण वाढले; १५ जण व्हेंटिलेटवर, अजित पवारांनी घातले लक्ष

गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS या दुर्मिळ आजारांच्या रुग्णांत सध्या वाढ झालेली दिसत आहे. राज्यात या आजाराने चिंतेचे वातावरण असतानाच आता पुण्यातही या आजाराने थैमान घातले आहे. एकट्या पुण्यात या आजाराचे ७४ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १५ जण व्हेंटिलेटवर आहेत. याबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कमला नेहरु गुग्णालयात GBS रुग्णांवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे.

GBS patients

नेमका काय आहे आजार?

अशुद्ध पाण्यामुळे हा आजार होत असल्याचे सांगितले जाते. पाण्याच्या इन्फेक्शनने हा आजार होतो, असे पुण्यात निदर्शनास आले आहेत. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, ते रुग्ण या आजाराचा बळी पडतात. या आजारावरील लाखोंचा खर्च पाहता, सरकारने या आजाराचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

पुण्यात सर्वाधिक रुग्ण

पुण्यातील सिंहगड रस्ता, नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आत्तापर्यंत ७४ रुग्णांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी १५ रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. पाच जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. या आजारावर लाखोंचा खर्च डाँक्टर घेत असल्याच्या काही तक्रारीही आल्या आहेत. त्यानुसार पुणे महानगर पालिका आरोग्य विभागाची बैठक घेण्यात येणार असून पुण्यातील सर्व रुग्णालयांवर लक्ष ठेवले जाणार आहे. कमला नेहरु रुग्णालयात ५० बेड या रुग्णांसाठी आरक्षित कऱण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाचे लक्ष़

या आजारावरील उपचारांसाठी अवास्तव शुल्क आकारु नये, यासाठी आरोग्य विभागाकडून दवाखान्यांवर लक्ष ठेवले जात आहे. महापालिकेने त्यासाठी मेडिकल ऑफिसर नियुक्त केले आहेत. नवले हाँस्पिटल, पुन्हा हाँस्पिटल, भारती हाँस्पिटल, दिनानाथ हाँस्पिटल येथील बिलांवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय पुण्यात सर्वत्र शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यावर लक्ष ठेवले जात आहे.

अजित पवारांचा सल्ला

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आयुक्तांना सुचना देत तातडीने कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये या रुग्णांबाबत बेड आरक्षित केले. पिंपरी चिंचवडच्या परिसरात वायसीएममध्येही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. याशिवाय या आजाराची औषधे महाग असली तरी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ससूनमध्येही या आजाराचा उपचार करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+