मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कधी सुरु होणार? आली मोठी अपडेट, टँकर-बस धडकेतील जखमींची संख्या 31वर
Gas Tanker-bus accident on Mumbai-Goa highwayas Tanker-bus accident on Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या निवळी घाटात बावनदीच्या जवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला. यामुळे मिनी बस रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली आणि बसमधले 31 प्रवासी जखमी झाले. टँकरमदील गॅस गळतीमुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून वाहतूक सुरु होण्यास काही काळ लागणार आहे.
आज झालेल्या या अपघाता जखमींमध्ये 15 पुरुष आणि 16 महिलांचा समावेश असून जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

टँकरमधून गॅस गळती
दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधून एलपीजीची गळती होत असून, मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बावनदी भागात येऊ नये. त्यांनी पाली आणि संगमेश्वर इथून पर्याय मार्गांचा वापर करावा, असं आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अपघातस्थळावरून केलं.
महामार्गावरील वाहतूक बंद
वायुगळती होत असल्याने वाहतूक सध्या त्या भागातली वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलासह आपत्कालीन सेवा यंत्रणा दाखल झाल्या असून, मदतकार्य सुरू आहे.
कसा झाला अपघात
मुंबई-गोवा महामार्गावर आज ( 8 जून) सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या निवळी घाटात बावनदीच्या जवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला आणि मिनी बस रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली. ही मिनी बस शिक्षकांना प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला घेऊन येत होती. 31 जखमींपैकी दोन महिलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.
पाली आणि संगमेश्वर इथून पर्याय मार्गांचा वापर करावा - प्रशासन
दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधून एलपीजीची गळती होत असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बावनदी भागात येऊ नये. त्यांनी पाली आणि संगमेश्वर इथून पर्याय मार्गांचा वापर करावा, असं आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अपघातस्थळावरून केलं.
कधी सुरु होणार महामार्गावरील वाहतूक
वायुगळती होत असल्याने वाहतूक सध्या त्या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. वाहतूक सुरळीतपणे सुरू होण्यास कमीत कमी दोन ते तीन तास लागू शकतात, अशी माहिती नितीन बगाटे यांनी दिली. महामार्गाजवळचं घर, बाग, गोठा आणि वाहनं यांचंही या अपघातात नुकसान झालं आहे. त्यात काही जनावरं जखमी झाली आहेत. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलासह आपत्कालीन सेवा यंत्रणा दाखल झाल्या असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक बगाटे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.












Click it and Unblock the Notifications