Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यात सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदेंचे विघ्नहर्त्याला साकडे; फडणवीसांच्या घरी बाप्पाचे आगमन

Ganesh chaturthi 2024 : देशभरात गणेशात्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाले असून. गणेशाचे घरोघरी आगमन होत आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांच्या घरीही गणरायाचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा या निवासस्थानी गणरायाचं आगमन झाले यावेळी कुटुंबीयासोबत मुख्यमंत्र्यांनी गणराजयांची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी येवो, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणरायाकडं घातले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की, राज्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली शेती होऊन राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिन येवो असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायाला घातले आहे. काही ठिकाणी जादा पाऊस पडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे पाठीशी आहे. राज्यातील गेली दोन वर्षे विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घातली आहे. सुबुद्धी मिळो आणि सर्वांना गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळो अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

CM House Ganpati

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुटुंबीय उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की,महाराष्ट्राला आणि देशाला स्थैर्य तसेच भरारी मिळावी, आपल्या प्रगतीचा वेग अजून वाढावा ही मनोकामना मी बाप्पाकडे व्यक्त केली आहे. बाप्पाला माहितच आहे की, महाराष्ट्राची प्रगती कोण करु शकते, बाप्पांना मानणा-या सर्व नागरिकांनीही बघितलेले आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बाप्पांचा आशिर्वाद मिळेल, सर्वांना सद्बुद्धी मिळो अशी मनोकामनाही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

त्यांना खंडणीच दिसणार

जयंत पाटील यांच्या सुरत लुटीच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या सरकारला खंडणी सरकार म्हटले गेले त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसणार असे मला एका अर्थाने समाधान आहे की जे ख-या अर्थाने इतिहासाचे अभ्यासक आहेत, सदानंद मोरे आदींनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. माझं एकच म्हणणं आहे की माझा राजा लुटारू नव्हता, माझ्या राजाला लुटारु म्हटलेलं मी खपवून घेणार नाही. जर इतिहासात काही चुकीच्या गोष्टी लिहिल्या गेल्या असतील त्या सुधारल्या पाहिजेत. कारण इंग्रजांचा इतिहासकाराच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहण्याएेवजी आपल्या इतिहासकारांना सोबत घ्यावे आणि जिथे कुठे महाराजांबद्दल चुकीचे लिहिले असेल ते सुधारण्याचा प्रयत्न करावा असंही फडणवीस म्हणाले.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते की, "शब्दच्छल करण्यात फडणवीस पटाईत आहेत. त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. महाराजांना स्वराज्य वाढवण्यासाठी संपत्तीची गरज होती. फक्त सिंधुदुर्ग किल्लाच नाही काही किल्ले आहेत. तिकडून खजिना आणला. 100 कोटीहून खजिना मिळाला. सुरत लुटली हे स्वराज्य वाढवण्यासाठी लुटली. पण सुरत लुटली हा शब्द बोलण्याचं धाडस नाही. कारण अमित शाह आणि मोदी विचारतील. आप कैसे बोल रहो हो? असं विचारतील".

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+