Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ganesh Chaturthi 2024 : जाणून घ्या गणेशोत्सवाचा इतिहास, संस्कृती आणि महत्त्व

Ganesh Chaturthi 2024 : गणपती किंवा गणेश ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय देवता आहे. भारतासोबत जगभरातील अनेक देशांत 10 दिवस चालणारा हा गणेशोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते, आणि अनंत चतुर्दशीदिवशी गणपती विसर्जन होते. गणेशोत्सवाचा इतिहास, त्याचे महत्व काय आहे याबद्दल माहिती असणे तुम्हाला आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे. या दिवसापासून गणेश चतुर्थीला सुरुवात होत आहे. यानंतर 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्थी आहे. या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

Ganesh Chaturthi 2024

गणेशोत्सवाचा इतिहास

असं म्हणतात की, गणपतीची लोकप्रियता मध्ययुगामध्ये साधारणपणे 9-10 व्या शतकात मोठ्या प्रमाणावर सुरु झालेली दिसते. त्या काळात गाणपत्य नावाचा संप्रदायच उदयास आला होता. तर काही तज्ज्ञांच्या मते गणेश चतुर्थी हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मध्ये सुरु झाल्याचा अंदाज आहे. शिवरायांनी पुण्यात या उत्सवाची सुरुवात केली, असे म्हटले जाते.

गणेश उत्सव असा रूजला संस्कृतीत...

पुढे पेशव्यांनी गणेशोत्सवाचा सुरु ठेवला. पेशवाईत हा सण कौटुंबिकच होता तो पुढेही पेशवाईच्या समाप्तीनंतर हा कौटुंबिक राहिला. मात्र 1983 मध्ये भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक गंगाधर लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव पुनरुज्जीवित केला. या उत्सवाला सार्वजिक रुप दिले. आणि हे लोकांनी मोठ्या उत्सवाने स्वीकारले.

ब्रिटीश राजवटीत जेव्हा अत्याचार वाढू लागले आणि कलम 144 नुसार, इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना गटांमध्ये एकत्र येण्यापासून रोखले, तेव्हा लोकमान्य टिळकांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक नवीन आणि अनोखा मार्ग शोधून काढला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व समाज एकत्र येत असेल तर ती आनंदाची बाब आहे, असे टिळकांनी म्हटले होते.

गणेशोत्सवाचे महत्त्व

गणेश चतुर्थी हा बुद्धीची देवता गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे, कोणत्याही कार्याची सुरुवात श्रीगणेशानेच होते. नवीन सुरुवात आणि समृद्धीची देवता म्हणूनही गणेशाची पूजा केली जाते. भक्त त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठीगणेशाला प्रार्थना करतात. श्रीगणेशाची पूजा केल्याने आपली ध्येये पूर्ण होण्यास मदत होते, असेही म्हटले जाते. जे लोक श्रीगणेशाची पूजा करतात, त्यांचे पाप धुतले जातात आणि त्यांच्या ज्ञानात भर पडते, असंही सांगितले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+