छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संभाजी राजेंची पहिली प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग : नौदल दिननिमित्त मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यामागचं कारण अद्यापर्यंत कळू शकलेलं नाही. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं.
अवघ्या काही महिन्यामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामूळे शिवप्रेमींमध्ये संतपाची लाट उसळली आहे. तर विरोधकांनी पक्षातील नेत्यांनी ही सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती पोस्ट
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत सरकारच्या या कारभारावर टीका केली आहे. "पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार !
आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे,अशी मागणी सुध्दया संभाजीराजे यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या या पत्राचा फोटो देखील एक्स या सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते… pic.twitter.com/1US6digK5j
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 26, 2024
आमदार वैभव नाईक यांनी बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक संताप व्यक्त केला आहे. मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांनी तोडफोड केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात, आणि तो पुतळा बसवण्यात जो काही हलगर्जी पणा झाला असेल, या सगळ्या कामात भ्रष्टाचार झाला आहे का याची चौकशी करण्यासााठी राज्य सरकारने समिती नेमली पाहीजे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे. अनथ्या आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जयंत पाटलांची सरकारवर टीका
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय होते. त्यामुळे या निर्माण कार्याच्या दर्जाची, गुणवत्तेची काळजी घेतली गेली नाही. हे इव्हेंटजीवी सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची एवढंच काम निष्ठेने सुरू आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
सरकारच्या एकंदरीत कारभारावर टीका करताना ते म्हणाले की, राज्यभर सुरू असलेली रस्त्याची कामे देखील सुमार दर्जाची आहेत. महाराजांचा पुतळा बनवताना देखील असाच घोटाळा केला असणार. त्यामुळेच तेथील भौगोलिक परिस्थितीत पुतळा उभा राहू शकला नाही. ही सर्वस्वी महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव वापरायचं. त्यांचे आचार, विचार, कृतीचा सन्मान होतोय का याबाबत सरकारला घेणेदेणे नाही असे म्हणत त्यांनी झालेल्या घटनेचा कडक शब्दांत निषेध केला.












Click it and Unblock the Notifications