आनंदाची बातमी..! 'लाडकी बहिण' होण्याची पुन्हा संधी; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला अभूतपुर्व प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत दोन कोटी ३० लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र तरीही अजून काही महिलांना हा लाभ मिळालेला नाही, हे लक्षात घेता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला मुदतवाढ देऊन आता १५ ऑक्टोंबरपर्यंत महिलांना या योजनेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.
लाडकी बहिण योजनेला मुदतवाढ
राज्यात आत्तापर्यंत दोन कोटी ३० लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात आला. तरीही काही महिला अर्ज करण्यापासून वंचित राहिल्याची चर्चा होती. या योजनेला यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेचे अर्ज स्विकारण्यात आले होते. आता पुन्हा सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. १५ ऑक्टोंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना शासनाने दिल्या आहेत.

आत्तापर्यंत पाच हप्ते झाले जमा
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण केले. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल २ कोटी ३० लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसेही जमा करण्यात आले. बहुतांश महिलांच्या बँक खात्यात आत्तापर्यंत पाच हप्त्यांचे मिळून ७,५०० रुपये देण्यात आले आहेत. आता उर्वरीत महिलांनाही १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. ही योजना आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी गेमचेंजर समजली जाते. सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ गेल्यामुळे ही योजना महायुती सरकारच्या पथ्यावर पडेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
योजनेवर विरोधकांनी केली टिका
लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले. उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही या योजनेवरुन अनेकदा जुंपली. या योजनेत कुणी खोडा घातला, तर येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणी तुम्हाला खोडा घातल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रागयडमधील मेळाव्यात दिले. आत्तापर्यंत सुमारे १७ हजार कोटींचे वितरण लाडक्या बहिणींना केल्याचे मंत्री अदीती तटकरेंनी सांगितले. या योजनेमुळं विरोधकांची तोंड काळी झाली, अशी टिकाही मुख्यमंत्र्यांनी केली.












Click it and Unblock the Notifications