लाडकी बहीण योजनेवरुन महाविकास आघाडीच्या नेत्याचं मुख्यमंत्री शिंदेना पत्र, केली मोठी मागणी
मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेची मूदत काढून टाकावी आणि ही योजना, 'सामाजिक सुरक्षा हक्क कायदा' या स्वरूपाची करावी अशी मागणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या सोशल मिडीयावर अंकाऊंटवरुन पत्राचा फोटो शेअर करत दिली ही माहिती दिली आहे.
काय म्हटलं आहे पत्रात ?
"शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सर्व्हर वारंवार बंद असल्याने नोंदणीला विलंब होत असून काही ठिकाणी नोंदणीच होत नसल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत," असं चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे. "6-6 तास ओटीपी येत नाही. त्यामुळे लाभार्थीना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत रहावे लागत आहे व अंतिम तारखेपर्यंत आपली नोंदणी होऊ शकणार नाही ही चिंता निर्माण झाली आहे," असं माजी मुख्यमंत्र्यांनी चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

"सॉफ्टवेअरचा वाढता तांत्रिक बिघाड पाहता या योजनेच्या अंतीम मुदतीची अट काढून ही योजना 'सामाजिक सुरक्षा हक्क कायदा' या स्वरूपाची करून राज्यातील सर्व पात्र बहिणींना कधीही लाभ मिळवता येईल असा बदल करावा, अशी मागणी चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे."
"राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने या योजनेचे घोषणा केली तेव्हा या योजनेची मुदत 15 जुलैपर्यंत होती. त्याबद्दल मी अधिवेशनात योजना नोंदणीची अंतिम तारीख वाढून टाकावी असी मागणी केली होती. तसेच या योजनेचा लाभ राज्यातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ महिलांना सुद्धा मिळावा यासाठी वयोमर्यादेची सुद्धा अट काढली जावी अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली तसेच कमाल वयोमर्यादा 60 वर्षांवरुन 65 वर्ष केली," असा उल्लेख चव्हाण यांच्या पत्रात आहे.
सॉफ्टवेअरचा वाढता तांत्रिक बिघाड,महिला वर्गाच्या मोठ्या रांगा
" लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी महिला वर्गाच्या मोठ्या रांगा आहेत. सॉफ्टवेअरचा वाढता तांत्रिक बिघाड पाहता 31 ऑगस्ट ही लाडकी बहीण योजनेची मुदत काढून ही योजना 'सामाजिक सुरक्षा हक्क' या स्वरुपाची करुन राज्यातील सर्व पात्र बहिणींना कधीही लाभ मिळवता येईल असा बदल करावा ही विनंती,"असं चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सर्व्हर वारंवार बंद असल्याने नोंदणीला विलंब होत असून काही ठिकाणी नोंदणीच होत नसल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. ६-६ तास ओटीपी येत नाही. त्यामुळे लाभार्थीना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत रहावे लागत आहे व अंतिम तारखेपर्यंत आपली नोंदणी होऊ… pic.twitter.com/vKsIe1QRgX
— Prithviraj Chavan (@prithvrj) August 17, 2024












Click it and Unblock the Notifications