Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संजय राऊतांकडून आणीबाणीचे समर्थन; ठाकरे शैलीत पीएम मोदी अन् भाजपला लगावले फटकारे! बघा व्हिडिओ

Emergency 50 years Sanjay Raut supports Emergency : देशात आणीबाणी लागू होऊन आज 50 वर्ष पुर्ण झाली आहेत. या आणीबाणीविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाची हत्या आणि हा काळाकुट्ट दिवस म्हटले आहे. याच मुद्द्यावर भाष्य करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊतांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा समाचार घेत आणीबाणीचे समर्थन केले आहे. संजय राऊत यांनी खास ठाकरे शैलीत पीएम मोदी अन् भाजपला आज 25 जून 2025 रोजी फटकारे लगावले आहेत.

Emergency 50 years Sanjay Raut supports Emergency

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत म्हणाले, "संविधानाचा पूर्ण आदर करून, इंदिरा गांधींनी त्यावेळी आणीबाणी लादली होती... लोकशाहीमध्ये आणीबाणीला संवैधानिक मान्यता आहे, म्हणून तुम्ही त्याला 'संविधान हत्येचा दिवस' मानू शकत नाही असे म्हणत आणीबााणीचे त्यांनी समर्थन केले.

इंदिरा गांधींनी हेराफेरी करुन निवडणुका जिंकल्या नाहीत

संजय राऊत म्हणाले, "इंदिरा गांधी पैशाचा वापर करून, हेराफेरी करून निवडणुका जिंकू शकल्या असत्या, पण इंदिरा गांधींनी ते केले नाही. इंदिराजी लोकशाहीच्या 'चौकीदार' होत्या. गेल्या 11 वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी आहे..."

Take a Poll

संजय राऊत म्हणाले, "जर देशात कुणी धोका उत्पन्न होत असेल काही अघटीत घडत असेल तर पंतप्रधान राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आणीबाणी लावू शकतात हे संवैधानिक आहे तो सरकारला दिलेला अधिकार आहे, इंदिरा गांधींनी हा अधिकार वापरुन आणीबाणी लावली. त्या निवडणुकीलाही सामोऱ्या गेल्या. हे संवैधानिक आहे त्यामुळे संविधान हत्या दिवस असे याला मानले नाही जाऊ शकतं."

2014 पासून आजही देशात आणीबाणी

संजय राऊत म्हणाले, "2014 नंतर देशात आज अघोषित आणीबाणी सुरु आहे. आज जात आणि धर्म विचारुन घरांवर बुलडोजर चालवले जात आहे. आज विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक केली जाते नंतर कोर्टाने त्यांना सोडून दिले हे काय आहे ही आणीबाणी नाहीतर आणीबाणीचा बाप आहे. आम्ही आता या आणीबाणीत आहोत."

संजय राऊत म्हणाले, "करीम लालासारखे भाईलोकं इंदिरा गांधींनी जेलमध्ये टाकले होते आता असे लोक कुठे तर भाजपमध्ये आहेत. करीम लालासारखे लोक जर आज जीवंत असते तर भाजपचे मंत्री असते किंवा त्यांच्या पक्षात मोठ्या पदावर असते. इंदिरा गांधींनी संविधानाचा अधिकार वापरुन त्याचा वापर केला पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अघोषित आणीबाणी केली. नोटबंदी काय आहे त्यात किती लोक मारले गेले अशा अनेक गोष्टी मी सांगू शकतो."

आणीबाणीवर काय म्हणाले पीएम मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे की, "भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक म्हणजे आणीबाणी लागू झाल्याला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. भारतातील लोक हा दिवस संविधान हत्येचा दिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी, भारतीय संविधानातील मूल्ये बाजूला ठेवण्यात आली, मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले, प्रेस स्वातंत्र्य संपुष्टात आले आणि अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आले. जणू काही त्या वेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने लोकशाहीला अटक केली." आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसांची आठवण ठेवणाऱ्या किंवा त्या काळात ज्यांच्या कुटुंबांनी त्रास सहन केला त्यांना मी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर करण्याचे आवाहन करतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+