वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीज दर 26 टक्क्यांनी घटणार! देवेंद्र फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Electricity rates will be reduced by 26 percent : राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी वीज दर कपात केली जाणार असे सांगत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असेही ते म्हणाले आहेत.

इतिहासात प्रथमच महावितरणदर कमी करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला.
70 टक्के ग्राहक 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरतात देवेंद्र फडणवीस म्हणाले, या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील.
Good news on electricity tariffs!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 25, 2025
For the first time in the State’s history, electricity tariffs will be reduced — starting with a 10% cut in the first year, and a total 26% reduction in phases over the next 5 years.
Thanks to the Maharashtra Electricity Regulatory Commission…
हरित ऊर्जेवर भर, महावितरणची वीज खर्चात बचत
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे.
राज्यात गेल्या वर्षभरापासून वीज दर वाढीला सुरुवात झाली होती. महावितरणने प्रती युनिटच्या दरात वाढ केली होती, त्यामुळे वीज ग्राहकांना भुर्दंड बसत होता. सामान्यतः वीज बिल कपातीच्या निर्णय हा राज्यातील जनतेसाठी हितकारक आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या वर्षात वीज बिल जवळपास दहा टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. यानंतर आगामी पाच वर्षात टप्प्या-टप्प्याने वीज बिलात कपात केली जाईल. ही कपात जवळपास सव्वीस टक्क्यांनी कमी होणार आहे, असे झाल्यास जिथे १०० रुपये बिल येत होते त्यांना ७४ रुपये बिल येणार आहे. हा चांगला निर्णय असून गेल्या अनेक काळापासून राज्यातील जनता विज दर कपात व्हावी अशी मागणी करण्यात येत होती.












Click it and Unblock the Notifications