एकनाथ शिंदे यांचा मूड अचानक झाला फ्रेश..! 'ही' आहेत तातडीच्या पत्रकार परिषदेची पाच कारणे
Reasons for the press conference- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत, आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अडथळा आणणार नसल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्रंत्रीपदावरचा दावा सोडल्याचे संकेत दिले. आत्तापर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत अशा बातम्या येत होत्या. शिवाय शिवसेना याच पदासाठी अडून बसली असल्याच्याही चर्चा होत्या. या सर्व चर्चांना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिला. विशेष म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेत त्यांचा मूड एकदम फ्रेश दिसला. शिंदे यांच्या या फ्रेशमूडची कारणे आपण पाहूयात...

1. भाजपशिवाय पर्याय नाही
शिंदे यांच्या आजच्या फ्रेश मूडचे पहिले कारण होते, भाजपशिवाय पर्याय नसल्याचे... एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी शिवसेनेत बंड करुन हिंदूत्ववादी भाजपसोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. खरंतर शिवसेनेचा मूळ पिंडच हिंदूत्तववादी होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवणी केलेली शिवसेनेच्या नेत्यांना आवडली नव्हती. त्यामुळे त्यांनी मूळ शिवसेनेत बंड केले. त्यानंतर स्वतः वेगळे अस्तित्व दाखविण्यासाठी, शिवसेनेने यापूर्वी लोकसभा व आता विधानसभा निवडणूक लढवली. लोकसभेत पानीपत झालं. मात्र विधानसभेत केंद्रातील भाजपने दिलेल्या विक्रमी निधीमुळेच शिवसेनेला यश मिळवता आलं. त्यामुळे भाजपशिवाय शिंदे गटाला पर्याय नाही, हे एकनाथ शिंदे यांनी हेरलं असल्याचं दिसलं.
2. केंद्रातील भाजपची साथ महत्त्वाची
शिंदे यांची शिवसेना आत्ता कुठे एक वर्षांची झालीय. त्यामुळे आपलं वेगळे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व मोठं होण्यासाठी त्यांना भाजपशिवाय पर्याय नाही. कारण मुळात मुळ शिवसेनेतून वेगळं होतानाच, हिंदूत्व या एका मुद्यावरच शिंदे गट वेगळ झाला होता. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने शिंदे गटाला आपले आमदार सेफ करण्यासाठी, केंद्राच्या निधीची गरज लागणार आहे. त्यामुळे केवळ केंद्रातील साथ मिळविण्यासाठीच शिंदेंनी, आजचा निर्णय जाहीर केल्याचंही काहींचं म्हणणं आहे.
3. विरोधकांना उत्तर देणं महत्त्वाचं
विधानसभेचा निकाल लागून तीन दिवस झाले मात्र अजूनही सत्ता स्थापन होत नसल्याची संधी विरोधकांनी हेरली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गट मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसला आहे, अशा चर्चा सुरु झाल्या. अनेक तर्कवितर्क लढविले गेले. नाराज शिंदे गट आता भाजपला बाहेरुन पाठींबा देईल, असेही बोलले गेले. या सगळ्या प्रकारामुळे भाजप व शिंदे गटात असलेलं बाँण्डींग तुटण्याची भिती तयार झाली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जावू लागला. हेच चाणाक्ष शिंदे यांनी हेरले आणि तातडीने पत्रकार परिषद घेतली, असाही एक अंदाज बांधता येतो.
4. भाजपला दिला विश्वास
मुळात एकनाथ शिंदे यांची खरी ओळख महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून झाली. ही ओळखच गेल्यावेळी भाजपमुळे मिळाली, यावर शिंदे आजही ठाम आहेत. भाजपने १०५ आमदार असतानाही शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली, याबाबत शिंदे आजही कृतज्ञ आहेत. त्यामुळे यावेळी सर्वाधित आमदार येऊनही भाजपला डावलून, आपण मुख्यमंत्री पदावर अडून राहिलो, तर भाजपच्या श्रेष्ठींमध्ये वेगळा संदेश जाईल, अशी शक्यताही शिंदे यांना वाटली असावी. त्यामुळेच आपण भाजपसोबतच आहोत हे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले असावे, असेही वाटते.
5. मोदी-शहांचा विश्वास वाढला
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले, या चर्चा थेट दिल्लीपर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे गेल्यावेळी उपकार करुनही, शिंदे यावेळीही अडून बसले असते तर शिंदे यांची किंमत मोदी-शहांच्या दरबारी कमी झाली असती, असाही एक सूर होता. त्यामुळेच विरोधकांनी पेरलेल्या या चर्चा थांबाव्यात व विरोधकांना स्पष्ट चपराक दिली जावी, म्हणून शिंदे यांनी तातडीने ही पत्रकार परिषद घेतली असावी, असेही जाणकारांना वाटते. कारण या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी मोदी-शहांचे गोडवे गाऊन त्यांच्याबाबतची कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे शिंदे यांचे दिल्ली दरबारी असणारे वजन अजून वाढले, हे मात्र नक्की...












Click it and Unblock the Notifications