सौर ऊर्जा निर्मितीसाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न! मान्याचीवाडी राज्यातील पहिले सौरग्राम
Eknath Shindes efforts for solar power generation : महाराष्ट्र हे उद्योग प्रधान आणि शेतीप्रधान राज्य आहे. दोन्ही आघाड्यांवर महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे आणि महाराष्ट्रात या क्षेत्रात उचलली जाणारी पावले देशभरात नावाजली जातात. उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. अधिकाधिक ऊर्जा निर्मितीसाठी महाराष्ट्राने केलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत.
महाराष्ट्र हा अनेक वर्षांपासून जलविद्युत आणि औष्णिक उर्जेवर अवलंबून राहिलेला आहे. कोयनेसारख्या जलविद्युत प्रकल्पांनी महाराष्ट्राची ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणावर भागवली. विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांनी देखील महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर नेले. काही कालावधीनंतर पवन ऊर्जेचा प्रयोग देखील करण्यात आला. आज पश्चिम महाराष्ट्रात डोंगरांवर आणि टेकड्यांवर फिरणारी पवनचक्क्यांची पाती ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांची पोचपावती आहे.

कालानुरूप ऊर्जा निर्मिती क्षेत्रात अनेक नवे बदल झाले. गुजरात सारख्या राज्याने सौर ऊर्जा क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपारंपारिक आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर अधिक भर दिला. गुजरातमध्येच सर्वात मोठे सौर ऊर्जा पार्क उभे राहिले. नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी अधिकाधिक प्रयत्न केले आहेत. भविष्यात महाराष्ट्राची बहुतांश ऊर्जेची गरज सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातून भागेल अशा दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. आणि याचे श्रेय निश्चितपणे एकनाथ शिंदे यांना द्यावे लागेल.
वीजनिर्मिती क्षेत्रात मोठी कामगिरी
राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्यांना सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीजग्राहकांचे वीजबिल देखील शून्यवत होत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
मान्याचीवाडी राज्यातील पहिले 'सौरग्राम'
राज्यातील गावे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी राज्य सरकारने कृतीशील उपक्रम सुरु केले आहेत. आणि त्यांचे परिणाम देखील दिसून येत आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावामध्ये महावितरणच्या वतीने 100 टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे. राज्यातील पहिले 'सौरग्राम' झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गावात पूर्वी 5 लाख 25 हजार रुपयांचे वीजबिल येत होते. ते सौरग्राममुळे शून्य झाले आहे.
आता राज्यातील 100 गावे 100 टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून त्यासाठी गावांची निवड पूर्ण करण्यात आली आहे. सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.तसेच राज्य शासनाने मागेल त्यांना सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के रक्कम तर अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषिपंप व सौर पॅनेल्स मिळणार आहे. उर्वरित रक्कम राज्य शासन अनुदानातून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
भविष्यात सौर ऊर्जेद्वारे 12 हजार मेगावॅट विजेची निर्मिती
आगामी कालखंडात सौर उर्जा निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी देखील राज्य सरकारकडून पाउले उचलण्यात आली आहेत. येत्या दीड वर्षांमध्ये राज्यात सौर ऊर्जेद्वारे 12 हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्री शेतात जाण्याची गरज राहणार नाही. राज्याने सौर ऊर्जेमध्ये मोठी आघाडी घेतली आहे.
47 हजार कोटींचे करार
केंद्राचे 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठण्यासाठी अनेक निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारने अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी 47,500 कोटी रुपयांचे चार सामंजस्य करार केले.हे प्रकल्प 2030 पर्यंत 50 टक्के अक्षय ऊर्जा साध्य करण्याच्या राज्य सरकारच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने असतील. या प्रकल्पांच्या विकासामुळे 18,828 रोजगार निर्माण होतील. ऊर्जा निर्मितीसाठी पारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पावर तसेच कोळशावर अवलंबून राहण्यापेक्षा नैसर्गिक स्त्रोतावर आधारित ऊर्जा निर्मिती करण्याकडे राज्य सरकारचा कल आहे.
महाराष्ट्र अग्रेसर राहणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पूर्ततेला गती दिली. त्यातील अनेक प्रकल्प आज पूर्णत्वास गेले आहेत. कित्येक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. सिंचनाच्या अनेक योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पांसाठी मान्यता घेण्यात आली आहे. आणि राज्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या ऊर्जा क्षेत्रात नवनवे प्रयोग करून राज्य सदैव अग्रेसर राहील याची खबरदारी देखील एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.












Click it and Unblock the Notifications