Eknath Shinde : माझी लाडकी बहीण योजना कायम राहणारच! विरोधकांनो खोडा का घालताय?- एकनाथ शिंदेंचा सवाल
Eknath Shinde: "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम राहणार आहे अनेक लोक लाडकी बहिण योजनेविरोधात गेले निवडणूक जुमला आहे असे हिनवले पण त्यांनी (विरोधकांनी) तर काही दिले नाही पण जेनतेला आम्ही देत आहोत, या योजनेत विरोधक का खोडा घालत आहेत?" असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकनाथ शिंदे म्हणाले, उदगीर जिल्हा निर्मिती, उदगीर विमानतळ, उदगीर वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मंत्री संजय बनसोड यांनी केली आहे. त्यांची मागणी मान्य होण्यासाठी बनसोड यांच्या पाठीशी आपण उभे राहावे असेही त्यांनी जनतेला उद्देशून म्हटले आहे. सर्वसामान्य घरातील मुलगी या देशाची राष्ट्रपती बनली आहे, सर्व सामान्य परिवारातून नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाडकी बहिण योजना बंद होणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत राज्य शासनाने केंद्र शासनाच्या लखपती दिदी योजनेसह मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना, अन्नपुर्णा योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांमुळे शासन सकारात्मक दिशेने वाटचाल करत असल्याचे सीएम शिंदे यांनी म्हटले.
कोणतीही बहिण योजनेपासून वंचित राहणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती पुढेही चालूच राहणार आहे. माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि माता भगिनींचा आशीर्वाद कायम राहिल्यास दीड हजाराची रक्क्म वाढविली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
संविधान बदल होणार ही अफवा विश्वास ठेवू नका
एकनाथ शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आर्थिक महासत्ता बनण्याकडे अग्रेसर असून, अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आम्ही झेप घेतली आहे. महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत कायम आघाडीचे राज्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
संविधान बदलाच्या अफवेला त्यांनी फेटाळून लावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सामान्य कुटुंबातील एक संघर्षशील महिला आपल्यापुढे राष्ट्रपती म्हणून विराजमान आहेत. तर मागास वर्गीयाचे प्रतिनिधीत्व नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.(Eknath Shinde )












Click it and Unblock the Notifications