मुंबईच्या 'तिजोरी'वरून टोलेबाजी; शिंदेंचा ठाकरेंवर 'रहमान डकैत' हल्ला अन् विकासाची 'धुरंधर' ग्वाही
Eknath Shinde Targets Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरदार भाषण करत केवळ विरोधी पक्षावर टीका केली नाही, तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात 'गेम चेंजर' योजनांची माहिती देत महायुतीची भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली. विशेषतः मुंबईच्या कथित गैरव्यवहारांवरून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर "रहमान डकैत" असा जहाल टोला लगावला, तर स्वतःला 'धुरंधर' म्हणून सिद्ध करण्याचा दावा केला.
'रहमान डकैत' विरुद्ध 'धुरंधर' महायुती
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पूर्वीच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले. शिंदे म्हणाले, "आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही." कोविड काळात असो वा मिठी नदीच्या कामात, विरोधी पक्षाने प्रत्येक ठिकाणी दरोडा घातला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधत म्हटले की, "ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत आहेत, तर आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर आहोत."

शायरीतून आव्हान
महायुती मुंबईला लुटणाऱ्यांना योग्य धडा शिकवेल, हे सांगताना शिंदे यांनी शायरीचा वापर केला. "मुंबईची तिजोरी लुटणाऱ्या असल्या रहमान डकैताना पाणी पाजणारी 'धुरंधर' महायुती आहे. इलाका किसी का भी हो, धमाका महायुतीच करेल. 'हमारी सारी योजना हैं गेम चेंजर, कॉर्पोरेशन का इलेक्शन जित कर हम ही होंगे धुरंधर' "
मी कामावर बोलणारा नेता: विकासावर भर!
टीकाकारांना उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी आपली ओळख 'कामावर बोलणारा नेता' म्हणून अधोरेखित केली. ते म्हणाले, "माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही." विरोधक त्यांना 'घटनाबाह्य' म्हणत असले तरी ते कामावर लक्ष केंद्रित करत आहेत. सर्वसामान्य घरातील व्यक्ती मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाल्यामुळे ही जळजळ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या कामाची पद्धत स्पष्ट करताना त्यांनी म्हटले, "न मैं गिरा न मेरे हौसले गिरे, पर मुझे गिराने वाले कई बार गिरे." मी टीकेला टीकेने नाही, तर कामाने उत्तर देतो. मी आरोपांना सभ्य भाषेत उत्तर देतो, असे ते म्हणाले.
'DCM'ची उपाधी
शिंदे यांनी सांगितले की, लोक त्यांना 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' (DCM) म्हणतात, कारण ते खुर्चीसाठी नव्हे, तर लोकांसाठी काम करतात.
मुंबईच्या भविष्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना!
एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली आणि मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकणार नाही, अशी ग्वाही दिली.
मुंबई अविभाज्य
"सूर्य चंद्र आले, कुणाच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही," असे ठामपणे सांगत त्यांनी मुंबईकरांना दिलासा दिला. समुद्रात काळे पाणी जाणार नाही आणि मुंबईतील राजकीय प्रदूषणही दूर करू, असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाचे प्रकल्प
- वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडला मान्यता.
- मुंबईत पॉड टॅक्सी सुरू होणार.
- बिकेसी ते नवी मुंबई विमानतळ भुयारी बोगदा.
- विरार ते वाढवणपर्यंत रस्ते विकास.
- झोपडपट्टीधारकांना दिलासा: झोपडी धारकांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम सुरू आहे.
बाळासाहेबांना आदरांजली
बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी दिनी (२३ जानेवारी) मुंबईकरांसाठी योजना पुष्प अर्पण करण्यात येणार आहे. तसेच, विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
- सेंट्रल पार्क: मुख्यमंत्री झाल्यावर आयुक्तांशी चर्चा करून ३०० एकरचे सेंट्रल पार्क करण्याचे काम सुरू केले.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा शब्द पक्का
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना शिंदे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि विरोधी पक्षाच्या टीकेला उत्तर दिले. राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना १५ हजार कोटींची मदत दिली आहे, तसेच नियम बदलून शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवली.
कर्जमाफीची ग्वाही
त्यांनी कर्जमाफीबाबतचा शब्द पाळणार असल्याचे स्पष्ट केले. "आम्ही शब्द दिला आहे, कर्जमाफी होणारच. सत्तेत येण्यापूर्वी दिलेला शब्द पाळणार, प्रिंटिंग मिस्टक म्हणणार नाही."
'लाडकी बहीण' योजना
लाडकी बहीण योजना सुरूच राहील. "कोणी 'माई का लाल' आला तरी लाडक्या बहिणीची ओवाळणी बंद होणार नाही. त्यांना २१०० रुपये देणार म्हटलं तर देणारच," असे ठामपणे त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications