मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल- एकनाथ शिंदेंची घोषणा
Eknath Shinde Press Conference Update on CM Post : आम्ही नाराज होऊन रडणारे नाही, लढणारे लोक आहोत. हा विजय आतापर्यंतचा विजयातील ऐतिहासिक निर्णय आहे. जीवतोडून निर्णय घेतले. मी कोणालाही अंतर केले नाही. मी जनतेतला मुख्यमंत्री म्हणून लोकांनी मला पसंद आहे. माझं मोजमाप व्हावं म्हणून मी कामं केले नाही. जीवनामध्ये सरकारमधून काय देता येईल, याचे काम केले, असे एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकारपरिषद ठाणे येथे संपन्न झाली. या पत्रकारपरिषदेला शिवसेना नेते दादा भुसे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक यांच्यासह विविध आमदारांची उपस्थिती होती.
मोदी-शहांना स्वत: फोन करून सांगितले
शिंदे म्हणाले की, राज्याला पुढं न्यायचे असेल तर केंद्राकडे जावं लागतं. मी कुठेही ताणून ठेवले नाही. मी स्वत: मोदी साहेबांना व शहा साहेबांना मी स्वत:हून फोन करून सांगितले. सरकार बनवताना कुठलीही अडचण नाही. तुम्ही तुमचा निर्णय आम्हाला एनडीए म्हणून मान्य असेल. भारतीय जनता पार्टीसाठी जसा अंतिम आहे, तसाच एकनाथ शिंदे यांना देखील म्हणजेच शिवसेनेला देखील मान्य असणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
#Live l 27-11-2024 📍ठाणे
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 27, 2024
📡 पत्रकार परिषदेतून लाईव्ह
https://t.co/VmH4C3lRNt
शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असेल
एकनाथ शिंदे म्हणाले की, मी सर्वांना सांगू इच्छितो की, महायुती मजबूतीने जिंकली, आमची जबाबदारी वाढली आहे. लोकांनी दिलेल्या मॅनडेटचा आम्ही सन्मान केला पाहिजे. भारतीय जनता पक्ष व वरिष्ठ नेतृत्व जे निर्णय घेतील. त्याला पूर्णपणे समर्थन आहे. पूर्णपणे पाठिंबा शिवसेनाच असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच आपण एकत्र भेटत आहोत. महाराष्ट्रात जो काही विजय मिळाला तो रेकॉर्डब्रेक विजय मिळाला आहे. महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला आहे. महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही सुरू केली. कल्याणकारी योजना व विकास यांची सांगड घातली. त्यामुळे हा जनतेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांनी कामं केले. मी दोन ते तीन तास झोपत असे. 80 ते 100 सभा घेतल्या. कार्यकर्ता म्हणून मी काम केले आहे. मी स्वत:ला मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मी कॉमन मॅन म्हणून काम केले आहे. या सर्वसामान्य जनतेसाठी मी कामं केले.
मी सर्वसामान्य कुटुंबातील आलो आहे. सर्वसामान्य कुटु्ंबातील वेदना मला समजतात. काटकसर कशी करायची हे नियोजन कसं करायचे हे मी जवळून पाहिले आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, ज्येष्ठ असतील. सोन्याने चमच्या तोंडात घेऊन आलेल्या लोकांना गरीबी कशी कळणार. ते आम्हाला कळली. लाडकी बहीण व भावांसाठी आम्ही काम केलं.
शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य माणसाला काही तरी सरकारकडून काम केलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो. केंद्रातून मोदी-शहा यांचे पाठबळ होतं. आम्हाला अडीच वर्ष त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले. अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचे दिवस जबाबदारी दिली. प्रत्येक दिवसाचा वापर मी लोकांसाठी वापरला. यासर्व अडीच वर्षांच्या काळात केंद्र आणि राज्यसरकार एकाच विचाराचे होते त्यामुळे मी विकास करू शकला आहे.
शिंदे म्हणाले की, आम्ही घेतलेले निर्णय हे ऐतिहासीक आहेत. महाविकास आघाडीच्या काळामध्ये सिंचनाचे प्रश्न असेल ते सोडवले. प्रचंड राज्याच्या विकासासाठी काम केल आहे. राज्य एक नंबरला नेण्याचे काम आम्ही केलं. पण, महाविकास आघाडीच्या काळात राज्य मागे गेले होते. पण आम्ही पुन्हा राज्य एक नंबरला आणले. या निवडणुकीत मतांचा वर्षाव झाला. त्याचे कारण म्हणजे केवळ राज्याचा विकास झाला. लाडका बहीणींचा लाडका भाऊ अशी माझी ओळख निर्माण झाली आहे. ही नवीन ओळख माझ्यासाठी मला समाधान देणारी आहे. मी समाधानी आहे, अडीच वर्षांच्या कारकिर्दीच्या काळात अनेक कामे केले आहे.
उद्या अमित शहांसोबत बैठक होणार
एकनाथ शिंदे म्हणाले की, माझे महायुतीत काय स्थान आहे, त्याची माहिती मी तुम्हाला उद्या देईल. कारण, उद्या अमित शहा यांच्यासोबत आमची बैठक आहे. त्यात तिन्ही नेत्यांच्या बैठक होईल. त्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन होईल.
निकाल लागून चौथा दिवस, तरीही मुख्यमंत्री ठरेना
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आज चौथा दिवस उजाडला आहे. तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यामुळे, महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असा सवाल मविआच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

त्यातच, मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव जळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि स्वत: एकनाथ शिंदे हेही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. मात्र, महायुतीमध्ये भाजपला मिळालेलं 132 जागांचं संख्याबळ पाहता मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, हे दिसून येते.
त्यातच, भाजप आमदारांकडूनही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी दबावगट तयार केला जात आहे. राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असतानाच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळाल्याची माहिती आहे.
भाजप समर्थकांचा उत्साह वाढला
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुका लढवल्या असून मोठ्या संख्येने बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपने 132 जागांवर यश मिळवल्याने भाजप समर्थकांचा उत्साह वाढला आहे. तर, महायुतीला तब्बल 237 जागांवर जय मिळालं असून भाजप 132, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला 41 जागा जिंकता आल्या आहेत. त्यातच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती देत मुख्यमंत्रीपदासाठी आपला पाठिंबा दिल्याची माहिती आहे.
त्यामुळे, एकनाथ शिंदेंची नाराजी जास्त काळ राहिल असं दिसत नाही. कारण, अजित पवार व भाजप यांची एकूण जुळवाजुळव केल्यास बहुमताचा आकडा सहजच पार होत आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन काय भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
उदय सामंत काय म्हणाले?
उदय सामंत यांनी शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, अशी भूमिका मांडली आहे. विरोधकांच्या दाव्यात दम नाही , मी चॅलेंज करतो की त्यांनी आपला विरोधी पक्ष नेता निवडून दाखवावा , आम्हाला सल्ला देण्याची आवश्यकता नाहीये. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही सगळ्यांची इच्छा अद्याप मुख्यमंत्रिपदावर शिकाकमोर्तब झालं नाही. अडीच वर्ष राज्याच्या विकासाची आम्ही काम केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं आम्हाला वाटतं, असं सामंत हे काल माध्यमांशी बोलताना म्हणाले.












Click it and Unblock the Notifications