दिल्लीतील फुसका फटका आला; पंचसुत्री थापा मारुन गेला! CM एकनाथ शिंदे यांची राहूल गांधींवर टीका
Eknath Shinde on Rahul Gandhi : "काल दिल्लीतील फुसका फटका महाराष्ट्रात आला अन् पंचसुत्री थापा मारून गेला आहे. आपले फटाके फुसके नाही, आपल्या योजनांमुळे सगळ्यांच्या तोंडाला काळा फेस आला. बुरी नजर वाले तेरा मुह काला म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्यावर टीका केली.
शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (ता. 7) नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले.

'मविआ'च्या 'पंचसूत्री'वर टीका
'अडीच वर्षात महाविकास आघाडीने केलेले काम सांगा, आम्ही दोन वर्षात केलेले काम सांगतो. दुध का दुध, पानी का पानी होऊन जाऊ द्या,' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच मी कॉमन मॅन मुख्यमंत्री आहे, येत्या 23 तारखेला ॲटम बाँम्ब वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
नमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा लाडक्या बहिणींना नमस्कार, दोन वर्षात आपण एवढे काम केले की विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले. आपल्याकडे फटाक्यांची काही कमी नाही. आज मी प्रचारासाठी आलो, 23 तारखेला विजयाचे फटाके फोडायला येईल.
गेल्या दोन वर्षात नरेंद्र भोंडेकर यांनी अनेक विकासकामे केली. मी काही उद्घाटन सोहळ्यांना आलो होतो. विकासाचे दुसरे नवा म्हणजे नरेंद्र भोंडेकर. त्याच्या कामामुळेच महायुतीमधील सर्वजण आज एकत्र आलेत. मी स्वतः नरेंद्रच्या मागे मी उभा आहे. एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा तन मन धनाने काम करतो, तेव्हा काय विकास होतो, याचे उदाहरण म्हणजे नरेंद्र आहे.
आपले प्रिंटिंग मिस्टेकवाले सरकार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. 'आपण जे बोलतो ते देतो. काँग्रेस महाविकास आघाडीचे इतर राज्यांमध्ये बघितले कर्नाटक, राजस्थान, हिमाचलमध्ये योजना जाहीर केल्या मते घेतली निवडून आले. नंतर म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे. आपले प्रिंटिंग मिस्टेकवाले सरकार नाही. शेतकर्यांच्या धान्याला पुढच्या काळामध्ये पंचवीस हजार रुपयेचा दर केल्याशिवाय आपण राहणार नाही,' असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आपल्या योजना धडाकेबाज
एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली व म्हणाले, 'दिल्लीतला फुसका फटाका काल महाराष्ट्रात येऊन गेला. कसलीतरी पंचसूत्री का थापासुत्री मारुन गेला. आपल्या या धडाकेबाज योजनांमुळे सगळ्यांच्या तोंडाला फेस आला आहे. बुरी नजरवाले तेरा मुह काला. आपल्याच सगळ्या योजना त्यांनी ढापल्यात असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.
आचारसंहीतेनंतर डिसेंबरचे पैसेही मिळणार
आम्ही लाडक्या बहिणींना ओवाळणी देत होतो तेव्हा विरोधक म्हणत होते भीक देताय का? लाच देताय का? आता लाडक्या बहिणींचा तोंडचा खास पळवण्यासाठी विरोधक कोर्टात गेले. या योजनेला बदनाम केले. एकीकडे विरोध करायचा आणि आपल्या वचननाम्यातून योजना ढापायच्या, असे विरोधक करत आहेत. आम्ही बोलतो ते करुन दाखवतो. हे दोन्ही हाताने देणारे सरकार आहे. जसे 20 नोव्हेंबरला मतदान होईल. तात्काळ आचारसंहिता संपताच डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील असेही त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications