Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

BMC महापौर निवडीआधी 'हॉटेल पॉलिटिक्स' सुरू; नगरसेवक 'ताज'मध्ये नजरकैदेत, तर शिंदे-अजित पवार कुठे?

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. सत्तेचा आकडा गाठल्यानंतरही फोडाफोडीच्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांसाठी 'सिक्युरिटी प्लॅन' तयार केला असून, दुसरीकडे सरकारमधील अंतर्गत नाराजीमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

Eknath Shinde hotel politics

नगरसेवकांची 'ताज लँड्स एंड'मध्ये रवानगी

मुंबई महापालिकेत महायुतीने बहुमत मिळवले असले, तरी महापौर निवडीपर्यंत कोणताही धोका पत्करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तयारी नाही.

शिवसेनेच्या (शिंदे गट) सर्व २९ निर्वाचित नगरसेवकांना दुपारी ३ वाजता वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विरोधी पक्षांकडून (विशेषतः ठाकरे गटाकडून) नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न होऊ नयेत आणि नगरसेवकांची एकजूट कायम राहावी, यासाठी हे 'हॉटेल पॉलिटिक्स' सुरू करण्यात आले आहे.

कॅबिनेट बैठकीतील 'ती' अनुपस्थिती चर्चेत

एकीकडे मुंबईत सत्तास्थापनेची गडबड सुरू असताना, गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा पेच पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री-एकनाथ शिंदे आणि अजित पवार-गैरहजर राहिले.

नाराजीचे संकेत: एकनाथ शिंदे मुंबईत असूनही आणि अजित पवार पुण्यात असूनही बैठकीला न आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अस्वस्थता : महापालिका निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने किंवा सत्तेच्या वाटपावरून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चिन्हे आहेत.

महापालिकेतील सत्ता समीकरण

२५ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाची मुंबईवरील एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. सभागृहातील बलाबल खालीलप्रमाणे आहे. भाजप ८९, शिवसेना (शिंदे) २९, शिवसेना (ठाकरे) ६५, मनसे ०६, राष्ट्रवादी (शरद पवार) ०१, काँग्रेस २४

शिंदेंचा 'अडीच वर्षांचा' फॉर्म्युला आणि महापौरपदाचा पेच

शिंदे गटाने ९० पैकी २९ जागा जिंकून आपला 'स्ट्राइक रेट' चांगला राखला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी, शिंदेंच्या पाठिंब्याशिवाय त्यांना महापौर बसवता येणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'अडीच वर्षे भाजप आणि अडीच वर्षे शिवसेना' असा महापौरपदाचा फॉर्म्युला मांडला आहे.

मराठी महापौर

ठाकरे बंधूंनी (उद्धव आणि राज) 'मराठी महापौर' या मुद्द्यावरून भाजपची कोंडी केली होती. त्यामुळे आता महायुतीला एखादा वजनदार मराठी चेहराच महापौरपदी द्यावा लागणार आहे.

अविभाजित शिवसेनेचा मोठा पराभव

१९९७ पासून सलग सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेसाठी हा निकाल धक्कादायक आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ६५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मुंबईतील अमराठी मतदारांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि मराठी मतांच्या विभाजनामुळे 'ठाकरे ब्रँड'ला मुंबईत मोठा तडा गेला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+