Mahayuti press conference : आजचा विजय ऐतिहासीक- CM शिंदे; वाचा-फडणवीस, अजितदादा काय म्हणाले
Mahayuti press conference : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले- आजचा दिवस ऐतिहासीक आहे. तर विजय देखील ऐतिहासीक विजय आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती. लोकांनी मतांचा प्रेमांचा वर्षाव महायुतीवर केला आहे. लाडकी बहीण, लाडकी भाऊ, लाडका शेतकरी असेल यांनी सर्वांनी प्रेम दाखवलं. सर्व मतदारांचे धन्यवाद देतो.
शिंदे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात आम्ही जे काम केले. जे निर्णय घेतले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्य असे आहेत. स्पीड ब्रेकर हटवले. काम गतीने सुरू झाली. अटल सेतू, समृद्धी महामार्ग विकासाला प्राधान्य दिले. एकाच उद्देश राज्याचा सर्वांगिण विकास हाच आहे. अडीच वर्षानंतर बंद पाडलं होतं त्याला सुरू केले होते. त्याला फायदा झाला.

दुसरीकडे कल्याणकारी योजनामध्ये लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, तीन गॅस दिल्या, वीजबील माफ केले. एका आतापर्यंतच्या सर्वात जास्त मोबदला या कल्याणकारी योजनांचा लाभ केला. या राज्यातील प्रत्येकातील घटकाला विचार केला. सर्वसामान्यांचे सरकार हा उद्देश आहे. आम्हाला अभिमानाने सांगायचे की, मोदी सरकार आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
केंद्राने भरपूर या राज्याला दिला आहे. डबल इंजिनचे सरकार वेगवाना सरकार निर्णय घेणारं सरकार हे लोकांना भावले.
शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजना असेल किंवा शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला. यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला. हे देणारं सरकार लोकांनी विश्वास ठेवला. पाच हप्ते दिले. एकंदरीत या राज्यातील सर्वसामान्यांचे सरकार ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. कॉमन मॅनला आम्ही सुपर मॅन केले आहे.
लोकांनी कल्याणाचे राजकारण स्विकारले. तर सूडाचे राजकारण लोकांनी नाकारलं. लोकसभेतील आमचा केवळ फेक नरेटिव्हमुळे पराभव झाला. आरोपाला आरोपाने उत्तर दिले नाही. कामातून उत्तर दिले. घरी बसुन काम करता येत नाही. 2019 ला जे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होते ते झाले नाही. ते लोकांनी लक्षात ठेवले आणि आता ते सिद्ध करून दाखवले आहे. खरी शिवसेना कुणाची आहे हे देखील लोकांनी दावखून केले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले की, काल प्रत्येकजण अंदाज व्यक्त केले जात आहेत. काल तर आम्ही कुठेच नव्हतो. महाराष्ट्राची निकाल लागला आहे. लोकसभेतील पराभवातून आम्ही स्वत:ला सावरले. लाडकी बहीण योजना गेमचेंजर आहे. आता आमच्यावर जबाबदारी आली आहे. कारण, एवढ्या प्रचंड बहुमताने लोकांनी निवडून दिले आहे. मी जेव्हापासून राजकारणात तेव्हापासून एवढ्या एकहाती विजय कधी पाहिलेला नाही. प्रचंड यश पहिल्यांदाच मिळाले आहे.
जसे जसे आकडे दिसत होते, तसे तशी आमची जबाबदारी वाढत आहोत. आम्ही त्यासाठी काम करू. आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे. आता विरोधक काहीही बोलतील. महाराष्ट्रातील सर्व रिजनमध्ये महायुतीच जोरात आहे. या निवडणुकीत आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळाले आहे. खऱ्या बातम्या देत चला असे टोला लगावला.
सकाळच्या नऊ वाजेच्या भोंगावर विश्वास नाही. काही ठिकाणी काऊंटिंग चालू आहे. महायुतीची जबाबदारी वाढलेले आहे. जनतेच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो. राज्याच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत. सर्वांचे मनापासून आभार मानतो.
देवेंद्र फडणवीस म्हणाले- जनतेचा आभारी
देवेंद्र फडणवीस म्हणाले - मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक आहे. मोदीजींवर जनतेने दिलेला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांचे अतिशय मनापासून आभारी आहे.












Click it and Unblock the Notifications