Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

त्यांना बॅगा, खोके पुरत नाही, त्यांना कंटेनर लागतं; दापोलीतून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय बोलत आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्यांचे काम करत आहे. बॅगा तपासणी करत आहे. परंतु, त्यात काही नसते. त्यांना बॅगा पुरत नाही, त्यांना खोके पुरत नाही. त्यांनाल कंटेनर लागतात. ते विदेशात पाठवले जातात, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. दापोली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तर कोकणाच्या विकासासाठी मी शब्द देतो. तो नक्कीच पूर्ण होणार, असेही प्रतिपादन केले.

कोकणात उबाठाला एकही जागा जिंकता येणार नाही

एकनाथ शिंदे म्हणाले की, उबाठाला कोकणात एकही जागा जिंकता येणार नाही. कारण, हे कोकण बाळासाहेबांच्या विचारांचे आहे. बाळासाहेबांना मानणारा येथील मतदार आहे. त्यामुळे शिवसेना आमच्याकडे आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे लोक देखील आमच्याच सोबतीला आहेत. योगेश कदम यांच्या माध्यमातून कोकणाचे नंदणवन करण्याचे काम केले जाईल. योगेश कदम यांना माझी साथ कायम राहिल, असेही शिंदे म्हणाले.

Maharashtra Assembly Election 2024

एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीने दिलेला वचननामा पूर्ण करणारी माणसं आम्ही आहोत. हा वचनमाना म्हणजे ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, लाडकी बहि‍णींना लखपती झाल्याचे आम्हाला पाहायचे आहे. पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार आहोत. महिलांची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे.

67 टीएमसी पाणी कोकणातच अडवले जाईल

मु्ख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बदलापूरचा निर्णय योग्य आहे की नाही. पोलिस काय बघ्याची भूमिका घेणार आहे का?, रामदास कदम यांचे काम मला लक्षात आहे. कोकणात पाणी अडवले पाहिजे. वाहून जाणारे पावसाचे पाणी हे कोकणाला सुजलाम सुफलाम करू शकेल. या योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली. 67 टीएमसी पाणी येथे अडवले जाईल. कोकणातील बॅकलॉक भरून काढण्यासाठी कोकणाचे महामंडळाची स्थापना केली. त्यातून कोकणाचा विकासाला गती मिळेल. जे जे काही या ठिकाणी करायचे आहे, ते- ते करण्याची तयारी आहे, असेही शिंदे म्हणाले.

सर्व विकासकामांचे स्पीड ब्रेकर काढले

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचाराला मुठमाती केली. ही जनता बाळासाहेबांवर परिणाम करणारी जनता आहे. लोकसभेत येथील जनतेते दाखवून दिले की, कोकणात बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना थारा नाही. अडीच वर्षात काय केलं, एकनाथ शिंदे यांनी स्पीड ब्रेकर काढलं. कर्जमाफी केली जाणार आहे.

आघाडीला ज्यांचा चेहरा नको, त्यांना जनता काय मान्य करणार?

ज्यांच्या चेहरा त्यांच्या आघाडीला मान्य नाही, तो महाराष्ट्रातील जनतेला कसे चालणार आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले आहे की, शब्द दिल्यानंतर मागे फिरायचे नाही. कोणाला धमक्या देत आहात, एकनाथ शिंदे पोकळ धमक्यांना घाबरत नाही. कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण आम्ही सोडून आणला. उबाठाचे बालेकिल्ले जनतेने उद्धवस्त केले. केवळ शिवसेना आणि धनुष्यबाणाला लोकांनी साथ दिली. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+