Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'या' कारणांनी आले धनंजय मुंडे यांच्या जीवनात वादळ! जाणून घ्या वैयक्तिक जीवन आणि वादविवाद अन् आरोप

Dhananjaya Munde Personal Life Controversy : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काही महिन्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून ते कार्यरत होते पण आता त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरण प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव आले आहे, वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जातात, त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आणि आज राजीनामाही मुंडे यांनी दिला.

धनंजय मुंडे आणि वाद तसेच संघर्ष हे समिकरणच आहे. धनंजय मुंडे यांचे जीवन जसे संघर्षमय तसे काही वादांनाही त्यांना तोंड द्यावे लागले आहे. अगदी आव्हाने स्वीकारत ते विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते झाले त्यासोबतच मंत्री देखील झाले. त्यांच्यावर वैयक्तिकरित्या आरोपही झाले. त्यांच्या वैयक्तिक जीवनात वादळही आले आहे, आपण आज त्यांचे जीवन आणि वाद यावर प्रकाश टाकूया.

Dhananjaya Munde Personal Life Controversy

धनंजय मुंडे यांचे कुटुंब

धनंजय मुंडे यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी नाथरा, परळी वैजनाथ,जि. बीड येथे झाला. धनंजय मुंडे यांचा विवाह राजश्री मुंडे यांच्याशी झाला आहे.

धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

धनंजय मुंडे हे भारतीय जनता पक्षात युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कारकि‍र्दीला सुरुवात केली. जे सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) सदस्य आहेत आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते .

  • धनंजय मुंडे यांनी 2019, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून विजय मिळवला.
  • धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री होते.
  • सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री म्हणून यापूर्वी, त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका बजावली होती.

वैयक्तिक जीवन आणि वाद

काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष

  • 2009 ला परळी विधानसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडेंना डावलत पंकजा मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. तेव्हा धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाले.
  • परळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकाला उमेदवारी देण्याची मागणी केली. मात्र गोपीनाथ मुंडे यांनी त्यास विरोध केला असे बोलले जाते.
  • या वादामुळे मुंडे कुटुंबात तेव्हा फूट पडली होती, बराच काळ धनंजय मुंडे हे आपली चुलत बहिण आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली.
  • दरम्यानच्या काळात महायुतीत अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सामिल झाल्यानंतर पुन्हा गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र आले आहेत.

धनंजय मुंडे आणि वाद

  • विकिपिडियानुसार, जानेवारी 2021 मध्ये, गायिका रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती जी नंतर मागे घेण्यात आली.
  • धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपांचे खंडन केले आणि राजीनाम्याच्या विरोधकांच्या मागण्या फेटाळून लावल्या.
  • एका प्रेस रिलीजमध्ये, मुंडे यांनी दावा केला की ते रेणू शर्माची बहीण करुणा शर्मा यांच्याशी 'नातं' आहे आणि 'त्या' नात्यातून त्यांना दोन मुले देखील आहेत जी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाला माहिती होती.
  • यानंतर करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर सतत आरोप होत गेले, भांडण तंट्यापासून त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यापर्यंत करुना शर्मा यांनी त्यांच्याशी दोन हात केले आहेत.

संतोष देशमुख प्रकरणावरुन राजीनाम्याची मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण-हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांना अटक झाली. त्यानंतर मुंडे यांच्यावर टीकाही झाली, त्यानंतर या वादग्रस्त मुद्द्यावरुन त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली. दरम्यान, 3 मार्च 2025 रोजी मुंडे यांनी महाराष्ट्राच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी वैद्यकीय कारण सांगितले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+