Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास कसा आहे? कौटुंबिक वाद आणि वाल्मिक कराडशी संबंध घ्या जाणून

Dhananjay Munde's political career : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. या प्रकरणात आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे धुरंधर नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजल्या जाणारा वाल्मिक कराडला संतोष देशमुख यांच्या अपहरण प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले. वाल्मिक कराडसोबत असलेल्या त्यांच्या कथित आर्थिक संबंधाचे पुरावे अनेकांनी सादर केले. अंजली दमानिया, सुरेश धस हे मुंडेंच्या विरोधात कमालीचे आक्रमक झाले. वाल्मिक कराडसारखी गुन्ह्यातील संशयित व्यक्ती धनंजय मुंडेंच्या जवळ कशी? हा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरु केली.

Dhananjay Munde s political career

अखेरीस 3 मार्च रोजी संतोष देशमुख यांना हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची मोठी लाट उसळली. बीड बंदची घोषणा करण्यात आली. वातावरण एवढे तापलेले पाहून चक्र पटाटपट फिरली अन् देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्या, असे आदेश धनंजय मुंडेंना दिले. हा आदेश प्रमाण माणून शेवटी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिला.

धनंजय मुंडे यांना राजकीय वारसा

लाभलेला आहे. हा वारसा त्यांना त्यांचे काका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे तडफदार नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि वडिल पंडितअण्णा मुंडे यांच्याकडून लाभला आहे. गोपीनाथ मुंडेंसारखेच धनंजय मुंडे हेही शब्दांवर प्रभुत्व असलेले आणि प्रभावी नेते म्हणून उदयास आले. विद्यार्थी आघाडी ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव आहे, विविध सरकारमध्ये वेगवेगळी खात्याचे मंत्रीपदही त्यांनी संभाळले आहे.

धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रवास

  • धनंजय मुंडे यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी परळी तालुक्यात झाला. त्यांच्या घरात राजकीय वारसा होता.
  • धनंजय मुंडे 1995 च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले.
  • सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले.
  • धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात भाजपमधून केली.
  • भाजप सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते.
  • महाविकास आघाडीत अजित पवारांचा पक्ष असताना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ते सामाजिक न्याय मंत्री होते.
  • एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये कृषीमंत्री होते.
  • देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते.

काका-पुतण्यातील संघर्ष

2009 ला परळी विधानसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडेंना डावलत पंकजा मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. तेव्हा धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाले. नंतर परळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकाला उमेदवारी देण्याची मागणी केली. मात्र गोपीनाथ मुंडे यांनी त्यास विरोध केला असे बोलले जाते आणि या वादामुळे मुंडे कुटुंबात तेव्हा फूट पडली होती. दरम्यानच्या काळात महायुतीत अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सामिल झाल्यानंतर पुन्हा गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र आले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+