'मला अर्धांगवायू नाही,मला बेल्स पाल्सी आहे', मंत्री पाटील यांच्या विधानावर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अलीकडेच त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांना फेटाळून लावल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये आहे की, आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.

dhananjay munde

मला अर्धांगवायू झाला नाही

श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार. मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही. स्पष्ट केले की, त्यांना अर्धांगवायू झाला नसून 'बेल्स पाल्सी' हा आजार झाला आहे. हा आजार दीड महिन्यांपूर्वी झाला असून, त्यामुळे चेहऱ्यावर परिणाम झाला आहे आणि अजूनही बोलायला त्रास होतो.

काय म्हणाले होते बाबासाहेब पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी नांदेड येथे एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबद्दल एक विधान केलं होतं. त्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. मंत्री बाबासाहेब पाटील यांना धनंजय मुंडे यांच्या गैरहजर राहाण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी बाबासाहेब पाटील म्हणाले की, "तुम्ही आधी हे समजून घ्या की, त्यांची तब्येत ठीक नाही. त्यांना अर्धांगवायू झाला आहे. त्यामुळे त्यांना बोलता येत नाही. त्यांचे डोळे वाकडे झाले आहेत", असं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर चर्चा सुरु झाल्या.

नामदेव शास्त्री काय म्हणाले?

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताह सुरु आहे. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे येणार होते, मात्र ते काही तांत्रिक अडचणीमुळे येऊ शकले नाहीत. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली होती.

धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारं गेलं आहे. त्यांना बोलता येत नाही. त्यांची वाणी गेली आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन नामदेव शास्त्री यांनी केलं होतं. त्यामुळे मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरु होती. त्यानंतर मंत्री पाटील यांच्या विधानाने या चर्चेना हवा मिळाली. आता मुंडे यांनी स्वत: ट्विट करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+