Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अंजली 'बदनामिया'! धनंजय मुंडेंचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले- मी शांत बसलोय म्हणजे..समजू

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी सुमारे पावणे तीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपावर आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळले आहेत. तर अंजली दमानिया यांचा 'अंजली बदनामिया' असा उल्लेख करत त्यांनी जोरदार टोला लगावला.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. हे केवळ त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले गेले आहेत. कृषी विभागात मी मंत्री असतानाच्या काळात झालेली सर्व खरेदी ही शासन नियमानुसारच झाली असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

Santosh Deshmukh Murder Case

सनसनाटी आरोप केवळ प्रसिद्धीसाठी

सनसनाटी, धादांत खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवायची, याव्यतिरिक्त याच्यात मला काहीही आढळत नसल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. गेल्या 59 दिवसापासून माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे. ते का चालू आहे? कोण चालवतेय? हे मला माहिती नाही, असे देखील मुंडे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी अंजली दमानिया यांचा 'अंजली बदनामिया' असा उल्लेख करत टोला हाणला.

मुंडे म्हणाले की, आम्ही शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही, असा होत नाही. मुख्यमंत्र्यांचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना ऐवजी दमानियांना माहित आहे का? असा प्रश्न देखील मुंडे यांनी उपस्थित केला. अंजली दमानिया यांचा खोटेपणा हा केवळ मला बदनाम करण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले. अंजली दमानिया यांनी आजपर्यंत केलेले कोणतेच आरोप खरे निघाले नसल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.

एक तरी आरोप सिद्ध झालाय का?

अंजली दमानिया जेव्हापासून आरोप करतात तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी केलेला एकही आरोप सिद्ध झाला आहे का?, या आधी ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले, त्या नेत्यांकडे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख यांचे आरोपी मारले गेले आहेत, असा दावा देखील दमानिया यांनी केला होता. हा देखील दमानियांचा खोटेपणा होता. आरोप करण्याचे काम ज्यांनी केले, त्यांना शुभेच्छा. मात्र, माझे राजकीय आयुष्य मायबाप जनतेवर अवलंबून असल्याचा दावा देखील मुंडे यांनी केला आहे.

भ्रष्टाचार करायचा असता तर दोन वेळा मुदत वाढ देली असती का?

मी मंत्री असताना कृषी विभागात जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्ण पूर्व मान्यतेनेच राबवली गेली असल्याचा दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले गेले होते. त्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभाग व्हावे म्हणून दोन वेळा निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. भ्रष्टाचार करायचा असता तर दोन वेळा मुदत वाढ देईल का? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.

राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणे सोपे नसते?

बीडमध्ये भयंकर घटना घडली आहे. ही संवेदनशील घटना आहे. या प्रकरणी आरोपींना फासावर लटकवणे आमची जबाबदारी आहे. यातून वाद विवाद नको म्हणून मी गप्प आहे. एक विषय झाला की दुसरा विषय काढला जातोय? काय करायचं? अंजली दमानिया माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम करत आहेत. त्यांना हे काम ज्यांनी कोणी दिले असेल त्यांना माझ्या शुभेच्छा. मात्र साप साप म्हणून जमीन थोटपणे, मीडियातून सनसनाटी निर्माण करणे आणि एखाद्याच राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणे एवढे सोपे नसते, असे आव्हान देखील मुंडे यांनी दिले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+