धनंजय मुंडे तातडीने फडणवीसांच्या भेटीला; भेट नेमकी कशासाठी..? काय म्हणाले मुंडे..? राजकारण तापलं
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेत मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव येत आहे. विरोधक या मुद्यावरुन रोज सरकारला धारेवर धरत असल्याचे दिसत आहे. मंत्री मुंडे यांचे नाव या प्रकरणात येत असल्याने राज्याच्या राजकारणात रोज नवे खुलासे समोर येताना दिसत आहेत. त्यानंतर आज अचानक मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली.

सह्याद्री अतिथीगृहावर भेट
मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संतोष देशमुख हा माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच आहे. मलाही त्याच्या बाबतीत तितकाच आदर आहे. यात जो कुणी गुन्हेगार असेल, त्या सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझीही इच्छा आहे. आज मुख्यमंत्र्यांची भेट योगायोगाने झाली. या भेटीत सरपंच देशमुख यांच्या हत्तेत कुणाही व कितीही जवळचा असला तरी, त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
आरोप केवळ राजकारणासाठी
मुंडे पुढे म्हणाले, "फक्त राजकारणासाठी या प्रकणात माझ्यावर आरोप होत आहे. वाल्मिक कराड यांची सुरेश धस यांच्यासोबतही जवळीक होती. माझ्याही तो जवळचा आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याची चौकशी सुरु आहे. ही चौकशी पारदर्शकपणे व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. पण काहीजण फक्त राजकारण करण्यासाठी रोज सकाळी उठून माझ्यावर बोलतात, असा आरोपही मुंडे यांनी केला.
फक्त राजकारण चाललंय
संतोष देशमुख प्रकरणातील दोषींना फाशी व्हावी, ही माझीची इच्छा आहे. मात्र सध्या काहीजण फक्त राजकारण करण्यात धन्यता मानत आहेत. माझ्या निवडणुकीपासून ते थेट मंत्रीपद मिळेपर्यंत काहींनी राजकारण केलं. आता बीडच्या पालकमंत्रीपदासाठी हे सर्व चाललंय. माझ्या पक्षाचे नेते अजित पवारांकडे याबाबत निर्णय घेतीलच. पण जे चाललंय ते फार भयंकर आहे. त्यामुळेच हा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालावा, अशी माझी मागणी आहे, असंही मुंडे यांनी सांगितलं.












Click it and Unblock the Notifications