काहींच्या मते अटक होईल, काहीच्या मते राजीनामा... धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या, करुणा मुंडेंनी घेरल
अजित पवार गटाचे नेते व कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी संपताना दिसत नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर मुंडे यांच्या अडचणी वाढल्या. मात्र आता परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण व करुणा मुंडे यांनी केलेला कौटुंबिक हिसाचाराचा आरोप यामुळे मंत्री मुंडे पुन्हा चर्चेत आले आहेत.

दोन हत्या प्रकरणात संशय
मंत्री धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड सोबत असलेले घनिष्ठ संबंध पाहता, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी त्यांचं नाव जोडलं जात आहे. तसेच परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातही त्यांचे नाव घेतले जात आहे. या प्रकरणात मुंडे समर्थकांवरही संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. या प्रकरणांमध्ये अडकलेल्या धनंजय मुंडेंना आणखी एका खटल्याचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना खरी माहिती लपविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पत्नी करुणा मुंडेंचा आरोप
करुणा मुंडे यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना खरी माहिती लपविल्याबाबत नुकतीच ऑनलाइन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने परळी फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला. आज या प्रकरणाची सुनावणी झाली. आता पुढची सुनावणी १५ मार्चला होणार आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, जर धनंजय मुंडे आज न्यायालयात हजर राहिले नाहीत, तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होऊ शकते.
काय आहे नेमकं प्रकरण?
मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यातील शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत शर्मा यांनी तक्रार केली होती. आता याप्रकरणात पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे.
साहित्य संमनेलनातही चर्चा
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, त्यातच आता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications