मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणी लागलं तर सोडत नाही - फडणवीसांचा अनिल देशमुखांना इशारा
विरोधक माझ्यावर सातत्याने आरोप करीत आहेत मी असलं राजकारण करत नाही, कुणावर डूक ठेवून राहत नाही, मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणी नादी लागलं तर सोडत नाही, असा इशारा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या विरोधकांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खोटे आरोप करण्यासंदर्भात फडणवीस यांनी सांगितले होते असा आरोप केला होता. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.

माझ्याकडे ते व्हिडिओ त्यावरुनच गुन्हा नोंद
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीबीआयने जी चार्जसीट कोर्टात सादर केली त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गिरीश महाजानांवर कसा मोक्का लावायचा याबद्दल त्यात आहे. यासंदर्भातील ओडिओ - व्हिज्युअल्स पुरावे मी स्वतः दिले होते. त्यावरच केस झाली आहे. मोक्का लावणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाले.
त्यांच्याच लोकांनी मला व्हिडिओ आणून दिले
अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्याच पक्षाचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते काय बोलत होते, सचिन वाझे बद्दल काय बोलत होते, याचे ऑडीओ व्हिजुअल्स त्यांच्याच लोकांनी माझ्याकडे आणून दिले आहेत. आज पर्यंत मी यावर बोलत नव्हतो, मात्र आता वेळ आल्यावर मी ते जाहीर करेन अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर झाला होता, तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. आपण कधीही डूक ठेऊन राजकारण करत नाही. या प्रकरणात माझ्यावर आरोप केले तर कोणाला फायदा होणार आहे? देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कोणाला धोका वाटतो, त्यांच्याकडूनच असे प्रकार सुरु असल्याचे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल देशमुख सध्या जामिनावर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीत. शाम मानव यांनी जे आरोप केले त्याबद्दल मानव यांनी माझ्याशी बोलायला हवे होते, मात्र सध्या सुपारी घेऊन बोलणारे जे घुसले आहेत, त्यांच्या नादी मानव लागले आहेत का ? असा प्रश्न पडतो असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल देशमुख गृहमंत्री असताना विरोधी पक्षातील गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी त्यांनी कसा दबाव आणला होता, गुन्हे दाखल करायला लावले होते त्याचे काही ऑडीओ पुरावे आपण दिले होते, या संदर्भात सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, जरांगे यांच्यावरील केस २०१३ मधील आहे. यापूर्वी सुद्धा त्याना वॉरंट निघाले होते, ते त्यांनी रद्द करून घेतले आहे. तारखेला हजर राहिले नाही तर न्यायालय वॉरंट काढत असते, हा प्रक्रियेचा भाग आहे.












Click it and Unblock the Notifications