Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"झुट बोले कौआ काटे काले कौवेसे डरीयो.." फडणवीसांनी अनिल देशमुखांचा आरोप गाण्याच्या ओळीतच संपवला

नागपूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवे आरोप केले. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा मला बदनाम करण्यासाठी त्यांनी परमबीर सिंह यांच्याशी डील केलं असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अनोख्या अंदाजात गाण्याची एक ओळ पुटपुटत हा आरोपाचा विषय संपवला.

Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh Hundred Crore Recovery Case Maharashtra Assembly Election 2024

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी आज अनिल देशमुख यांच्या नवीन आरोपाला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी गाण्याच्या एका ओळीत हा विषय संपवला. "झुट बोले कौआ काटे काले कौवेसे डरीयो.." असं ते म्हणाले.

अनिल देशमुखांची स्पष्टोक्ती

अनिल देशमुख म्हणाले, सचिन वाझे यांची जस्टीस चांदीवाल यांच्या कोर्टात जेव्हा चौकशी झाली, तेव्हा त्यांना विचारण्यात आले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या पीएने तुम्हाला पैसे मागितले का किंवा वसुली करायला सांगितले होते का, त्यावर सचिन वाझे यांने कोर्टासमोर सांगितलं की, मला अनिल देशमुख किंवा त्यांच्या पीएने कधीही पैसे मागितले नाही किंवा वसुली करायचे सांगितले नाही.

जस्टीस चांदीवाल यांच्या कोर्टाचा रोजनाम्यात संपूर्ण मिनिटं काय काय स्टेटमेंट घेण्यात आले ते स्पष्ट आहे. सचिन वझे आरोप पुन्हा करत असेल तर माझ्याबद्दलच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा अशी मागणीही त्यांनी केली.

फडणवीसांवर टीका

अनिल देशमुख म्हणाले, अरे बाबा...देवेंद्र फडणवीस... गेल्या तीन वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांनीच कबुल केलं की, कशा पद्धतीनं मी 50-50 कोटी घेऊन शिवसेनेचे आमदार फोडले. देवेंद्र फडणवीस यांनी हेही कबुल केलं की, कशाप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडले. म्हणजे ते दोन पक्ष फोडून सत्तेल आले. ते मोठ्या आनंदाने सांगत आहे. पण फडणवीस यांच्या माध्यमातून हे फोडाफोडीचे राजकारण जे चालू आहे त्यावर महाराष्ट्राची जनता नाराज आहे.

राजकारण खालच्या स्तरावर

अनिल देशमुख म्हणाले, ते फोडाफोडी करत असताना जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. याशिवाय राज्यात दुसरे प्रश्न नाही का..महाराष्ट्रासमोर महागाईचा प्रश्न, बेरोजगारी, शेतकरी आदींचे प्रश्न असूनही ते याकडे लक्ष ते नाहीत. केवळ फोडाफोडी करुन त्यांनी राजकारण खालच्या स्तरावर आणले आहे. आमचे सरकार पाडण्यासाठी त्यांनी इडी, सीबीआयचा वापर केला असा आरोपही अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+