देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लॅन! शेतकऱ्यानंतर 'या' वर्गाला मिळणार मोफत वीज अन् सवलत! बीलही कमी येणार
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकहिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आता शेतकऱ्यांसोबतच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या डोक्यावरील वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पाऊले उचलली आहेत. 300 युनीट पर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल
डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, यासह येत्या 5 वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार आहे.

गरीब, मध्यमवर्गीयांना सौरऊर्जेअंतर्गत मोफत वीज
विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार गरीबांसोबतच मध्यमवर्गींना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे, जवळपास 300 युनीट पर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी एका कार्यक्रमात केली आहे.
शेतकऱ्यांसाठी काय आहे मोफत विजेची योजना
देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींकडे कटाक्षाने लक्ष देत आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली आहे. शेतीसाठी 12 तास विजेची शेतक-यांची मागणी होती. यादृष्टीने राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरु केली.
डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, यासह येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार आहे, वर्धा येथे त्यांनी ही घोषणा केलेली आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यात लोअर वर्धा प्रकल्प, वाढोणा-पिंपळखुटा आदी सिंचन प्रकल्पांद्वारे शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करून देऊ आणि जिल्ह्यातून जाणा-या समृध्दी महामार्गावरील नोडवर एमआयडीसी उभारुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
तुमचे वीज बील कमी होणार
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजबिलासंबंधी एक महत्वपूर्ण घोषणा केली होती. त्यामध्ये 100 ते 300 युनीटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर 17 टक्क्यांनी कमी केले जाणार आहेत. यासह 95 टक्के घरगुती ग्राहकांना वीज दर कपातीचा थेट लाभ मिळणार आहे, खासकरुन ग्राहकांनी जर स्मार्ट मीटर वापरले तर दिवसा वापरलेल्या विजेवर दहा टक्के सवलत मिळणार आहे. यासह राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बील दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कार्यवाही सुरु केली आहे. तसेच 300 युनीट पर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications