देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीवर पंकजा मुंडे, आशिष शेलार यांच्यासह सर्व भाजप नेते काय म्हणाले...
Mahayuti Leaders on Devendra Fadanvis : भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली. तर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहेत. राजभवनात महायुतीच्या नेत्यांनी सत्तास्थापनेचा दावा केलेला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसतोय. देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी निवड झाल्याबद्दल मराठवाड्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी फडणवीसांवर अभिनंदनचा वर्षाव केलाय. फडणवीसांच्या निवडीवर भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या देखील त्यांच्या आनंदाची प्रचिती देणाऱ्या आहेत.
कोण काय म्हणाले?
आमचा मूड चांगलाय - पंकजा मुंडे
देवेंद्र फडणवीसांचा अनुभव फार महत्वाचा ठरेल. देवेंद्रजी यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे, त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्वाचा ठरेल. आता आमचा मूड चांगलाय.

देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार- प्रसाद लाड
अखंड महाराष्ट्राच्या विकासासाठी शेतकरी कष्टकरी महिला कामगार, तरुण आणि राज्याच्या विकासासाठी 2019 मध्ये जे मॅनडेट राज्याला दिलं होतं. त्यात गद्दारी ज्यांनी केली त्या गद्दारांना जमिनीत गाडून जनतेने 100% त्यामुळे माईंडेड दिला आहे . त्यामुळे भाजपचा विजय झाला. विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. मुख्यमंत्रीपदी ते उद्या शपथ घेतली याचा आम्हाला खूप आनंद आहे, असे प्रसाद लाड म्हणाले.
आमच्यासाठी आज दिवाळी - आशिष शेलार
जनतेचा पाठिंबा यावेळी महायुतीला मिळाला. एकनाथ शिंदे यांनाही चांगल्या जागा मिळाल्या. अजितदादा पवारांचे नेतृत्वात राष्ट्रवादीलाही चांगलं यश मिळालं. भाजपला जे यश मिळालं त्या ऐतिहासिक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नरेंद्रजी मोदी, अमित शहा, नड्डाजी यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळालं. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी सर्वानुमताने देवेंद्र फडणवीस यांचे नाव आम्ही पुढे केलं. सत्ता स्थापनेचा आता दावाही करू. आमच्यासाठी आज दिवाळीच आहे, असे आशिष शेलार म्हणाले.
मिळालेलं बहुमतं हाच मोठा सन्मान - भागवत कराड
गटनेतेपदी निवड झाल्याने उद्या फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राला विकसित राज्य बनवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज होती. महाराष्ट्रातल्या जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न ते ओळखतात. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन. पाच वर्ष त्यांचं सरकार पाहिलं आहे. आताही जनतेला विश्वास आहे. मी मंत्रीपदाच्या कोणत्याही शर्यतीत नाही. आता नाव असणारच. आमचं लक्षच नाही त्याकडे. आम्हाला आता फक्त मिळालेलं बहुमत, सन्मान यातच आम्ही खूष आहेात, असे भागवत कराड म्हणाले.












Click it and Unblock the Notifications