साहित्यीकांनीही मर्यादा पाळाव्यात, मुख्यमंत्री फडणवीसांनी खडे बोल सुनावले; कोकाटेंचाही घेतला समाचार

नुकतेच दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात काही साहित्यीकांनी राजकीय हस्तक्षेपावरुन विधाने केली. राजकीय विधाने झाल्याने हे साहित्य संमेलन चांगलेच चर्चेत आले. त्यावरुन आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यीकांसह विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बोलताना प्रत्येकाने मर्यादा ठेवायला हव्यात, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. तसेच राज-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. मात्र त्यांनी सकाळच्या भोंग्याला देखील माध्यमांनी सुसंवाद शिकवायला हवा, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला. तर पुढे बोलताना त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचा देखील समाचार घेत त्यांना मोलाचा सल्ला दिला.

Devendra Fadnavis

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलत होते, यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यांच्यामध्ये सुसंवाद झाला. राज्यात कोणीही कोणाशी सुसंवाद साधत असेल तर त्याचे स्वागतच आहे. राज्यात कोणीही विसंवाद करू नये. सुसंवाद असायलाच हवा, यात कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. तसेच आपणही सर्वांनी मिळून सकाळी नऊ वाजेच्या भोंग्याला देखील सुसंवाद कसा करायचा हे शिकवले तर राज्यातील संवादाची परिस्थिती चांगली होईल, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

साहित्य संमेलनाच्या मर्यादा पाळाव्यात

प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा ठेवायला हव्यात. विशेषतः जे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांनी देखील वारंवार असे वाटते की, राजकारण्यांनी आमच्या व्यासपीठावर येऊच नये. किंवा तशा प्रकारचे त्यांचे नेहमी वक्तव्य असते. अशावेळी साहित्यिक यांनी देखील पार्टी लाईन वरच्या कमेंट करणे योग्य नाही. त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे, असे माझे मत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नीलम गोऱ्हे या उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होत्या. मी त्या पक्षात नव्हतो. त्यामुळे त्या पक्षात काय चालायचे हे त्याच सांगू शकतात. मी त्यावर कमेंट करू शकत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

चौकशीचा अर्थ अनियमितता नाही

आमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो. त्यामुळे कृषी विभागाबाबत आलेल्या तक्रारीच्या प्रकारची चौकशी आम्ही करत आहोत. मात्र तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असे म्हणण्याचे काही कारण नाही. तक्रारीच्या चौकशीतून जे काही समोर येईल त्यानंतरच याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कृषी विभागात अनेक प्रकारे गैरव्यवहार झाले असल्याचा आरोप होत आहे. यासाठी माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना जबाबदार धरले जात आहे. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

माणिकराव कोकाटेंना दिला मोलाचा सल्ला

मंत्र्यांचे पीएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांनाच असतो, हे माणिकराव कोकाटे यांना माहिती नसेल. मंत्री केवळ नावांची शिफारस करत असतात. तो प्रस्ताव आल्यानंतर मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय करतात. हे काही नव्याने होत नाही. यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत देखील मी सांगितले आहे. मंत्र्यांनी हवे ती नावे पाठवावी. मात्र त्या नावांमध्ये ज्यांची नावे फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामांमध्ये आहेत. त्यांना मान्यता देणार नाही, असे मी सांगितले आहे. आतापर्यंत 125 च्या जवळपास नावे माझ्याकडे आली आहेत. त्यातील 109 नावे क्लियर केलेली आहेत. उर्वरित नावे क्लियर केलेली नाही. कारण त्यांच्यावर कुठला तरी आरोप आहे किंवा त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोणीही नाराज झाले तरी अशा प्रकारच्या नावांना मान्यता देणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+