'खोटं बोलायचं अन् पळून जायचं, हे पळपुटे लोक': फडणवीसांचा शरद पवारांसह राहुल गांधींवर हल्लाबोल!
Devendra Fadnavis Slams Sharad Pawar Over EVM Remarks : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी आपल्याला 160 जागा जिंकून देण्याचे आश्वासन दिल्याचे पवारांनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तर त्यांनी शरद पवारांसह राहुल गांधींना पळपुटे लोक असल्याचा गंभीर आरोप देखील केला.

राहुल गांधींच्या भेटीनंतर पवारांना 'ईव्हीएम'ची आठवण?
फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी यापूर्वी कधीही ईव्हीएम (EVM) मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते. उलट, त्यांनी अनेकदा ईव्हीएमला दोष देणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. मात्र, आता राहुल गांधी यांच्या भेटीनंतर पवारांनी मतदान प्रक्रियेतील फेरफाराविषयी बोलणे सुरू केले आहे. "हा राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतोय," असे म्हणत फडणवीस यांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
🕜 1.30pm | 9-8-2025📍Mumbai.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 9, 2025
LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/aJjGEBzmcU
'खोटं बोलायचं आणि पळून जायचं'
ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर विरोधक करत असलेल्या आरोपांवर फडणवीस म्हणाले की, "विरोधकांनी कितीही संभ्रम निर्माण केला तरी भारताइतक्या पारदर्शक आणि मुक्त निवडणुका कुठेच होत नाहीत." निवडणूक आयोगाने बोलावल्यावर हे लोक जात नाहीत आणि शपथपत्र द्यायला तयार नाहीत. ते संसदेतील शपथ घेतल्याचे कारण देतात, पण संसदेतील शपथ न्यायालयात चालत नाही. कारण, त्यांना माहीत आहे की, जर त्यांचे खोटेपणा पकडला गेला तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे हे लोक "रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं," असे करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
हे ही वाचा : 2 लोकं भेटले, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली; शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
'पवारांचीही राहुल गांधींसारखी अवस्था'
फडणवीस यांनी पवारांच्या आरोपावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "मला एक गोष्ट लक्षात येत नाही, इतक्या दिवसांनी पवार साहेबांनी राहुल गांधी यांना भेटल्यावरच या सगळ्याची आठवण का आली?" ते पुढे म्हणाले की, "राहुल गांधी ज्याप्रमाणे काल्पनिक गोष्टी तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर रोज कपोलकल्पित कहाण्या सांगत आहेत, तशाच प्रकारची अवस्था शरद पवारांची झाली नाही ना?" असे म्हणत त्यांनी पवारांच्या आरोपांची खिल्ली उडवली.












Click it and Unblock the Notifications