राहुल गांधी, ठाकरेंनंतर आता देवेंद्र फडणवीसांचीही निवडणूक आयोगावर सडकून टीका! नेमकं काय घडलं..वाचा
Devendra Fadnavis Slams Election Commission for Postponing Nagar Panchayat Polls : महाराष्ट्रातील काही विशिष्ट नगर पंचायतींच्या निवडणुका अचानक रद्द (Postpone) करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधींप्रमाणेच फडणवीस यांनीही या निर्णयावर थेट भाष्य करत, निवडणूक आयोगाचा हा निर्णय 'पूर्णपणे चुकीचा' असल्याचे मत व्यक्त केले आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अचानक स्थगिती दिल्याने कार्यकर्त्यांचे झालेले नुकसान आणि आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

फडणवीस यांचा नेमका आक्षेप काय?
निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याच्या अभ्यासक्रमाचा दाखला दिला आणि आपला राग व्यक्त केला. "मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे अत्यंत चुकीचं आहे." अशा पद्धतीने प्रत्येक वेळी कोणी कोर्टात जाईल आणि निवडणुका पोस्टपोन होतील, असं आजपर्यंत कधी झालं नाही. निवडणूक आयोग कुठला कायदा काढतोय, कोणाचा सल्ला घेतोय याची मला कल्पना नाही."
फडणवीसांनी दिले निलंग्याचे उदाहरण
"निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली होती, एका व्यक्तीचा फॉर्म रद्द झाला म्हणून तो कोर्टात गेला. कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला. मग एका व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूक पुढे ढकलणे, हे चुकीचे आहे.
कार्यकर्त्यांवर अन्याय..
फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोगाच्या "या निर्णयामुळे त्या उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे, ज्यांनी या इलेक्शनची तयारी केली. उद्या निवडणुका आणि आज तुम्ही पोस्टपोन करता, त्यांची पैसा, त्यांची मेहनत, या सर्व गोष्टी वाया गेल्या. पंधरा-वीस दिवस त्यांनी आता पुन्हा प्रचार करायचा, हे मला अतिशय चुकीचे वाटते."
'नगर विकास विभागाचा संबंध नाही': स्वायत्ततेवर स्पष्टीकरण
या संपूर्ण प्रकरणात नगर विकास विभागाचा कोणताही संबंध नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर देखील भाष्य केले. ते म्हणाले, "नगर विकास विभागाचा या प्रकरणात संबंधच नाही, इलेक्शन विभागाचा संबंध आहे. इलेक्शन कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला तो आपल्याला मान्य करावा लागेल, पण माझं मत आहे की हा निर्णय चुकीचा आहे." फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या पाच संदर्भातला 'रिप्रेझेंटेशन' निवडणूक आयोगाला निश्चितच दिला जाईल आणि निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे आहे, हे आयोगाला सांगितले जाईल.












Click it and Unblock the Notifications