'बटेंगे तो कटेंगे'मध्ये चुकीचं काय आहे...? देवेंद्र फडणवीसांनी थेट केलं समर्थन
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसला आरक्षण मिटवायचंय. तोडा-फोडा आणि राज्य करा ही ब्रिटीशांची निती त्यांना अमलात आणायचीय, असा थेट आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर वेगवेगळ्या मुद्यांना हात घातला.
काँग्रेसला आरक्षण संपवायचंय
फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्री ही भारत जोडण्यासाठी नव्हतीच. त्या यात्रेतील त्यांच्या टीमला जातींचे तुकडे करायचे आहेत. विदेशात जाऊन ते आरक्षण रद्द करण्याच्या गोष्टी करताहेत. त्यांना वाटतं त्यांचं हे स्टेटमेंट भारतीयांना समजणार नाही. आपल्या आसपास मीडिया आहे, हे ते विसरले. भारतात आल्यावर त्या विधानाची सारवासारव सुरु केली. आमची ही धर्मयुद्धाची लढाई आहे. आता धर्मयुद्ध म्हणजे सत्यासाठी युद्ध. आम्ही ती लढाई लढतोय, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

बटेंगे तो कटेंगे यात गैर काय
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'बटेंगे तो कटेंगे' असा नारा दिल्यामुळे विरोधकांनी जोरदार पलटवार केला. पण, बटेंगे तो कटेंगेमध्ये चुकीचं काय आहे. इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा भारत वेगळा झाला. आपण जातीत, प्रांतात बदललो तेव्हा आपलं नुकसान झालंय, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे नारा योग्यचं असल्याचं ठामपणे सांगितलं. 'पहिली गोष्ट अशी की, बटेंगे तो कटेंगेमध्ये चुकीचं काय आहे. इतिहास पाहिला विभागल्यावर आपलं नुकसान झालं आहे. विदेशी लोकांनी आक्रमण केलं, त्यांनी भारताचे तुकडे केले, विभागांना, माणसांना वेगळं केलं' असं फडणवीसांनी सांगितलं.
काँग्रेस जातींना वाटून घेतंय
काँग्रेसकडे मुस्लिम समाजाने 18 मागण्या मांडल्या. त्यातील एक मागणी ही 2014 ते 2024 या दरम्यान झालेल्या दंगलीतील आरोपींवरील गुन्हे मागे घेण्याचीही आहे. आता अशा लोकांची जर काँग्रेस साथ घेत असेल तर आपण एकत्र येऊन ही धर्मलढाई लढलीच पाहीजे. आज ओबीसी समाज एकत्र आहे. आज ओबीसी समाजाच्या 350 जाती वेगळ्या झाल्या, तर कुणीही विचारणार नाही. आज एसटी एकत्र आहे, उद्या एसटीच्या 54 जाती बाजूला होतील, त्यावेळी एसटीची ताकद राहणार नाही. काँग्रेस ही या जातींना वेगळं करत आहे. म्हणून आम्ही एक आहो तर सेफ आहोत, असं म्हणतोय' असंही फडणवीसांनी ठामपणे सांगितलं.
#WATCH | On Deputy CM Ajit Pawar's remark "there is no place for UP CM Yogi Adityanath's 'batenge toh katenge' slogan", Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says "...For decades, Ajit Pawar stayed with such ideologies which are secular and anti-Hindu. There is no real… pic.twitter.com/yFhOdyPwjj
— ANI (@ANI) November 15, 2024












Click it and Unblock the Notifications