अजित पवारांचं धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखं; फडणवीसांचा दादांना खोचक टोला
Devendra Fadnavis on Batenge to Katenge and Ajit Pawar : अजित पवारांबद्दल बोलायचं झाल्यास ते गेल्या अनेक दशकांपासून अशा विचारांच्या लोकांबरोबर राहिले आहेत जे स्वतःला सेक्युलर म्हणवून घेत आले आहेत.त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगत आले आहेत. परंतु, त्यांचं धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखं आहे, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लगावला. ते एएनआयशी बोलताना त्यांनी 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचे समर्थन केले तसेच त्याचा खरा अर्थ काय याबाबत देखील स्पष्टीकरण दिलं.
योगींच्या घोषणेमुळे राज्यात नवं वादंग
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे मोठा वाद निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. योगी यांच्या विधानाला देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थन केले. तर महायुतीचे भाग असलेले राष्ट्रवादीचे नेते यांना मात्र ही घोषणा पटलेली नाही. त्यामुळे महायुतीत चांगलाच वाद पाहायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एनएआयला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 'बटेंगे ते कटेंगे' विधानाचा अर्थ सांगून समर्थन केले. तर अजित दादांना या घोषणेचा अर्थ अजून कळालेला नाही, त्यामुळे त्यांना समजण्यासाठी वेळ लागेल, असा थेट टोला लगावला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीसांनी योगी आदित्यनाथ यांची घोषणा उचलून धरली आहे, तर मोदींच्या घोषणेला महामंत्र म्हटलं आहे. तर, त्यांचे सहकारी अजित पवार मात्र याविरोधात आहेत. यावर आता फडणवीसांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "या लोकांना (अजित पवार व पंकजा मुंडे) जनतेच्या भावना समजल्या नसतील. त्यांना काहीतरी वेगळं बोलायचं असेल आणि तुम्ही प्रसारमाध्यमांनी काहीतरी वेगळं अर्थ घेतला असेल किंवा त्यांना योगींच्या वक्तव्याचा अर्थ समजला नसेल. हे लोक योगींशी असहमत असण्यामागे या तीनपैकी एखादं कारण असू शकते.
अजित पवारांना वेळ लागेल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एएनआयशी बोलताना म्हणाले की, केवळ अजित पवारांबद्दल बोलायचं झाल्यास ते गेल्या अनेक दशकांपासून अशा विचारांच्या लोकांबरोबर राहिले आहेत जे स्वतःला सेक्युलर म्हणवून घेत आले आहेत.त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगत आले आहेत. परंतु, त्यांचं धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखं आहे. हिंदूत्वाचा विरोध म्हणजेच धर्मनिरपेक्षता अशी विचारधारा असलेल्या लोकांबरोबर अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून राहिले आहेत. त्यामुळे जनतेचा कल राष्ट्रवादीला समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल.
बटेंगे तो कटेंगेंचा अर्थ काय?
देवेंद्र फडणवीस म्हणाले- राहिला प्रश्न 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचा, तर, त्याचा अर्थ समाजाला एकत्र ठेवणे असा आहे. यात काहीही चुकीचं नाही. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'एक है तो सेफ है' या घोषणेला महामंत्र म्हटलं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण समाजाला एकत्र ठेवण्यासाठी एक मंत्र दिला आहे. आपण एकत्र राहिलो तरच आपला विकास होईल, असा त्यामागचा अर्थ आहे. काँग्रेस मात्र आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे.












Click it and Unblock the Notifications