महाराष्ट्रात औरंग्याचे महिमामंडन चालणार नाही, नाहीतर फाडून टाकू; फडणवीसांनी कोणाला दिला इशारा
Devendra Fadnavis on Aurangzeb Tomb : महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण, महिमामंडन चालणार नाही, अन्यथा आम्ही फाडून काढू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तर महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाचे गुणगाण होईल, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, ASI ने 50 वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारलाही तिला संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. पण महाराष्ट्रात औरंगबेजाबाच्या कबरीचे केव्हाही उदात्तीकरण होणार नाही. येथे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे उदात्तीकरण होईल.
तिथीनुसार शिवरायांची जयंती केली साजरी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने (तिथीनुसार) भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा येथील शिवरायांच्या पहिल्या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीसांनी या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा केली.
फडणवीसांकडून 4 महत्त्वाच्या घोषणा
देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना यूनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. संगमेश्वर येथे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली, तो संगमेश्वरचा वाडाही सरकार विकासासाठी घेणार आहे. सरकार तिथे स्मारक बांधेल.
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात ज्या ठिकाणी औरंगजेबाने कैद केले होते, ती जागाही स्मारक विकसित करण्यासाठी देण्यात यावी यासाठी सरकारने उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे. यासंबंधी अर्थसंकल्पातही योग्य ती तरतूद केली आहे.
पानीपतच्या युद्धात मराठ्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले होते. त्यानंतर 10 वर्षांनी महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर आपला झेंडा रोवला होता. त्यामुळे सरकार पानीपत येथेही स्मारक बांधणार आहे. तूर्त सरकार शिवाजी महाराजांच्या या मंदिराला तत्काळ तीर्थस्थळाचा दर्जा देईल.

औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, शिवरायांचे मंदिर भव्य दिव्य उभारले जाईल. तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरील आपली भूमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात केवळ शिवरायांचेच महिमामंडन होईल. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही. औरंगजेबाच्या कबरीला ASI ने 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. पण या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे केव्हाच महिमामंडन होणार नाही.
शिवाजी महाराजांचे मंदिर कशासाठी? ते यासाठी की आज आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन साधना करू शकतो याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देव, देश, धर्माची लढाई जिंकली म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. जसे हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचे दर्शन पूर्ण होत नाही. तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन आपल्याला फळणार नाही.
महिमामंडन होईल, तर ते छत्रपती शिवरायांचेच!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 17, 2025
क्रूर औरंगजेबाच्या पाशवी विचारांचे महिमामंडन अथवा उदात्तीकरण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून, ते विचार तिथेच चिरडून टाकण्यात येईल.
(छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण | भिवंडी, ठाणे | 17-3-2025)#Maharashtra… pic.twitter.com/PlkBI5WNR3
शिवरायांचे मंदिर खऱ्या अर्थाने राष्ट्रमंदिर
हे फक्त मंदिर नाही. या मंदिराला सुंदर तटबंदी आहे. बुरूजं आहेत. दर्शनीय असा प्रवेशमार्ग आहे. सुंदर बगिचा आहे. शिवरायांच्या जीवनातले सर्व प्रसंग आपल्याला इथे पाहावयास मिळतात. अतिशय सुंदर अशा शिल्पांमध्ये शिवरायांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत तथा छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतात, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीही इथे आहे. राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ माँसाहेबही इथे आहेत. त्यामुळे हे खऱ्या अर्थानं राष्ट्रमंदिर आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस या मंदिराचे कौतुक करताना म्हणालेत.












Click it and Unblock the Notifications