सावरकरांशिवाय मराठीचा विचारच होऊ शकत नाही; पुण्यातील विश्व मराठी संमेलनात फडणवीसांचे गौरवोद्गार
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. आपली सांस्कृतीक राजधानी आहे. येथे विश्व मराठी संमेलन होणे, ही आनंदाची गोष्ट आहे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावकरांबाबतही गौरवोद्गार काढले. स्वातंत्र्यवीर सावकरांशिवाय आपण मराठीचा विचारही करु शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

विश्व मराठी संमेलनाचे उद्धाटन
पुण्यातील विश्व मराठी संमेलनाचे उद्धाटन आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात मधु मंगेश कर्णिक यांचा सत्कार कऱण्यात आला. मधु मंगेश कर्णिक यांनी मराठीला खऱ्या अर्थाने समृद्ध केले, असे त्यांनी फडणवीस म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच संमेलन होत आहे, त्याचा मला आनंद असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
सावरकारांबाबत गौरवोद्गार
फडणवीस म्हणाले, "आपल्या बालगंर्धवला सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम होणार आहे. जेव्हा आपण मराठीचा विचार करतो, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर समोर येतात. त्यांच्याशिवाय आपण मराठीचा विचारच करु शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला जो शब्दांचा संग्रह दिला, जो शब्दकोष दिला, तो कुणीही विसरु शकत नाही. मराठी साहित्य विश्वातही सावकरांचे नाव अजरामर आहे, असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.
वादाबाबत घेतले चिमटे
फडणवीसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांचे भाषण झाले. त्यांनी काही लोक वाद तयार करत असल्याची खंत व्यक्त केली. हाच धागा पकडून फडणवीसांनी वाद घालणाऱ्यांना चांगलेच टोमणे मारले. ते म्हणाले, साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही, तर ते संमेलनच होत नाही. वाद निर्माण करणं हा आपला स्थायीभाव आहे. आपण संवेदनशील आहोत. वाद-विवाद, प्रतिवाद झाला पाहिजे. त्यातून खऱ्या अर्थाने मंथन होऊ शकतं, हे मी म्हणत नाही. आठव्या शतकात कुवलय माला नावाचं पुस्तक लिहिलं गेलंय. त्या पुस्तकात मराठी माणसाचे वेगवेगळे गुण-अवगुण सांगितलेत. त्यात मराठी माणसाला कलह करायला आवडतो, यावर एक प्रकरणच आहे. आठव्या शतकात हे लिहून ठेवलंय. त्यामुळे तुम्ही फार काळजी करु नका. अशा प्रकारची संमलेन आपण करत रहायची. कुणी नाव ठेवेल, कुणी चांगलं म्हणेल. त्यातून मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती, बुद्धी मिळते."












Click it and Unblock the Notifications