अटल सेतू : देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टची एकनाथ शिंदे यांच्याकडून पूर्तता
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानी असल्यामुळे देशभरातील लोक रोजगाराच्या आणि आपल्या स्वप्नांच्या शोधात मुंबईकडे धाव घेतात. अलीकडच्या काही वर्षात मुंबई वरचा ताण प्रचंड वाढतो आहे त्यामुळेच मुंबईत प्रत्येक वर्षी नवनवीन पायाभूत सुविधा विकासाचे प्रकल्प पूर्ण करावे लागतात. आता मुंबईचा विस्तार पश्चिम उपनगरात डहाणूपर्यंत, हार्बर मार्गावर पनवेल पर्यंत आणि मध्य रेल्वे मार्गावर कर्जत खोपोली पर्यंत झाला आहे. मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई शहर वसवण्यात आले आणि आता तिसरी मुंबई अर्थात महामुंबई आकार घेऊ लागली आहे.
सध्या मुंबई बरोबरच महा मुंबई परिसरात पायाभूत सुविधांचे असंख्य प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुंबई शहर महामुंबईला जोडण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे आणि त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने महामुंबई परिसराच्या विकासाला अधिक गती दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या काळात स्वच्छ मुंबई अंतर्गत डीप क्लीन ड्राईव्ह राबविण्यात आले. सामान्यांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला. उद्धव ठाकरे सरकारने स्थगिती दिलेली मेट्रो ३ झपाट्याने काम करून पूर्ण करण्यात आली आणि तिचा पहिला टप्पा आता कार्यान्वित झाला आहे. याशिवाय शहरातील रस्ते सिमेंटचे करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे सरकारने घेतला. यामुळे फक्त खड्डे बुजवण्यावर खर्च होणारे मुंबई महानगरपालिकेचे हजारो कोटी रुपये वाचणार आहेत.
अटल सेतू : मुंबईला वरदान
मुंबई आणि महामुंबई परिसराला वरदान ठरलेला आणि एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केलेला कुठला प्रकल्प असेल तर शिवडी न्हावाशेवा सागरी मार्ग अर्थात अटल सेतू. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती शिवडी हून निघून चिरनेर पर्यंत जाणारा 22 किलोमीटरचा हा सागरी सेतू महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू मानला जातो. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र 2019 साली उद्धव ठाकरे यांनी महायुतीशी काडीमोड घेतला आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवले. महाविकास आघाडी सरकार अल्पावधीतच स्थगिती सरकार म्हणून नावारूपास आले आणि या सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना स्थगिती दिली.
उद्धव काळात अटल सेतुही संथगतीने
महाविकास आघाडीच्या अत्यंत ढिसाळ आणि गलथान कारभारामुळे अटल सेतूचे कामकाज देखील संथ गतीने सुरू झाले. पण 2022 साली सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली. मुख्यमंत्रीपद मिळताच शिंदे यांनी रखडलेल्या प्रकल्पांना हिकमतीने गती दिली. ज्यात अटल सेतूचाही समावेश होता. जातीनिशी लक्ष घालून त्यांनी या प्रकल्पाच्या पूर्णत्वावर भर दिला आणि अल्पावधीतच हे काम पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

इंधनाची आणि वेळेचीही बचत
अटल सेतू मुंबईच्या पायाभूत सुविधा प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. पूर्वी मुंबईतून सायन पनवेल महामार्गाने पनवेल पर्यंत येण्यासाठी दोन ते अडीच तासांचा कालावधी लागत होता. आता हे अंतर अवघ्या 25 मिनिटात पूर्ण होत आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी त्यामुळे मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. दररोज चाळीस हजार हून अधिक वाहने या अटल सेतूवरून दररोज यजा करतात. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी हा एक अत्यंत उत्तम पर्याय ठरला आहे. वाहतूक कोंडी कमी होण्या व्यतिरिक्त इंधनाची बचत हा सर्वात मोठा फायदा झाला आहे. अटल सेतू पूर्ण झाल्यामुळे महामुंबई परिसरात गुंतवणूक प्रचंड वाढले असून बांधकाम क्षेत्रालाही त्याचा मोठा फायदा झाला आहे. दक्षिण मुंबईत छोट्या घरात राहणारे अनेक नागरिकांनी फक्त अटल सेतूमुळे महा मुंबई परिसरात मोठी घरे घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या परिसरातील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सागरी सेतू पूर्ण पूर्ण होतो तिथपासून महामार्गापर्यंत छोटी मोठी हॉटेल्स तसेच वाहन दुरुस्ती केंद्र सुरू झाल्यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
महामुंबईचा चेहरामोहरा बदलणार
एकनाथ शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गतीने पूर्ण करण्यासाठी देखील एकनाथ शिंदे या कार्यरत आहेत. अलीकडेच या विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचे यशस्वी लँडिंग झाले. 2025 पर्यंत हा विमानतळ प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत झाल्यानंतर महा मुंबई परिसराचे रुपडे पालटणार असून रोजगाराच्या हजारो संधी या परिसरात निर्माण होणार आहेत आणि या परिसरात होणारी गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी कळंबोली सर्कलच्या सुधारणेचा प्रस्ताव असून त्यासाठी 770 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दर्शविली आहे. त्यामुळे पुणे परिसरातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. बांधकाम क्षेत्र, पर्यटन, वाहतूक, हॉटेल्स अशा अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्रचंड प्रमाणात निर्माण होणार आहेत.
विरोधकांकडून प्रकल्पाची बदनामी
दरम्यान अटल सेतू पूर्ण क्षमतेने प्रवाशांच्या सेवेत कार्यरत झाल्यानंतर देखील विरोधकांनी या प्रकल्पाची बदनामी करण्याचे सत्र सुरू ठेवले. या सागरी सेतू मार्गाला विविध ठिकाणी तडे गेले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मात्र प्रत्यक्षात सागरी सेतू मार्गाला खड्डे पडले नसून पनवेल परिसरातील विविध भागातून सागरी सेतू वर जाणाऱ्या सेवा रस्त्याला भेगा पडल्याचे एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितले आणि अटल सेतूच्या बदनामीचा विरोधकांचा डाव शिंदे यांनी उधळून लावला.
शिंदे यांच्या नावाची सुवर्णाक्षरांनी नोंद
अटल सेतू या संकल्पनेचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांचे असले तरी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने पूर्ण करण्याचे श्रेय आणि संशय एकनाथ शिंदे यांना जाते. समृद्धी महामार्गाबरोबरच अटल सेतू या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या पूर्ततेत देखील एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहभाग नोंदवून महाराष्ट्राच्या इतिहासात स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य









Click it and Unblock the Notifications