खबरदार! भरतीत गैरप्रकार झाला तर..! शिंदे-फडणवीसांनी बदलले नोकरभरतीचे मापदंड
मुंबई लाखो भारतीयांची स्वप्ननगरी आहे. या नगरीत व एकंदर महाराष्ट्रात काम मिळावे, नोकरी मिळावी अशी अनेक भारतीयांची मानसिकता आहे. स्वप्न आहे. मात्र पेपरफुटीची प्रकरणे, भरती घोटाळे, वशिलेबाजी या सर्वांमुळे महाराष्ट्रात नोकऱ्या मिळणे कठीण होऊन बसले होते. प्रशासकीय नोकरी मिळविण्यासाठी आव्हाने वाढली होती. हजारो सरकारी नोकऱ्या असूनही सामान्यांचा या नोकरभरीवरुन विश्वास उडाला होता. सरकरी यंत्रणांवर सामान्यांना विश्वास ठेवणे, अवघड होऊ लागले होते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बदलले धोरणे
एकीकडे सामान्यांचा सरकारी यंत्रणावरील विश्वास उडायला लागल्यानंतर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवे धोरण राबवविले. युवकांच्या मनात एक नवा विश्वास स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या दोघांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सध्या नोकरभरतीचे मापदंड बदललेले दिसत आहेत. नोकर भरतीतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता कमालीची बदलून या दोघांनीही युवकांच्या मनात एक आशा निर्माण केलेली दिसत आहे. विकासात्मक उपक्रमांना चालना देऊन भरतीतील पारदर्शकतेमुळे हजारो सक्षम तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे.

परीक्षा यंत्रणा झाली होती बदनाम
महाराष्ट्रात आत्तापर्यंत पेपर फुटीची अनेक प्रकरणे उघडकीस आली. वर्षानुवर्षे नोकरभतीचे घोटाळे सुरु राहिले. शिक्षक पात्रता परीक्षा, आरोग्य भरती परीक्षा, तलाठी भरती परीक्षा आदी महत्त्वाच्य परीक्षा पेपर फुटीमुळे गाजल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 ते 2022 या काळात परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांच्या पदरी घोटाळ्यांमुळे निराशा पडली. पुणे सायबर शाखेने 2021 मध्ये खासगी कोचिंग क्लासवाल्यांच्या साखळीचा पर्दाफाश केल्यावर अनेक मोठी नावे या घोटाळ्यात समोर आली. त्यात 25 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली. म्हणूनच या भरती प्रक्रियेत अनूलाग्र बदल करण्याची मागणी जोर धरू लागली.
शिंदे-फडणवीसांनी आणली पारदर्शकता
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर या घोटाळ्यांची मालिक थांबविण्याचे प्रयत्न सुरु झाले. शिंदे-फडणवीस यांनी या भरतीत पारदर्शकता आणण्याचा चंगच बांधला. या परीक्षा प्रणालीमध्ये व्यापक सुधारणा करुन गेल्या दोन वर्षांतील विविध भरती परीक्षा या सुरळीत व विना भ्रष्ट्राचार पार पाडल्या. एमपीएसस्सी परीक्षेतील काही बदल हे यूपीएसस्सीप्रमाणे करण्यात आले. या बदलानंतर उमेदवारांचे मुल्यांकन हे राष्ट्रीय पातळीवर करण्यात येऊ लागले. त्यामुळे पात्र उमेदवारांना मोठ्या संधी मिळू लागल्या.
शिक्षक भरतीतही झाल्या सुधारणा
शिक्षक पात्रता परिक्षेत व भरतीत यापूर्वी अनेकदा भ्रष्ट्राचाराची प्रकरणे घडलेली होती. मात्र शिंदे-फडणवीस यांनी महायुती सरकार आल्यानंतर शिक्षक भरतीकडे विशेष लक्ष दिले. शिक्षकांसाठी पवित्र ऑनलाईन भरती पोर्टलची ओळख बदलली. या प्लॅटफाँर्मने विशेषतः ग्रामीण भागात प्रदीर्घ काळापासून असलेला बँकलाँग भरुन काढण्यास मदत झाली. 2024 या एका वर्षांच्या सुरुवातीलाच 11 हजार पदे भरली गेली. यामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल दिसून आला.
पोलिस भरतीतही सुधारणा
राज्यातील सर्वात मोठ्या पोलिस भरतीमध्ये महाराष्ट्रात 17 हजार जागांसाठी जवळपास पावणेदोन लाख अर्ज आले होते. या भरतीमध्ये संपूर्ण डीजीटल प्रक्रियेचा समावेश करण्यात आला. नवीन पडताळणी पायरीही तयार करण्यात आली. यंत्रणेतील अडथळे दूर करुन प्रक्रियेला गती देण्यात आली. पावसाळ्यात शारीरीक परिक्षांच्या वेळेवर सुरुवातील टिका झाली. मात्र पारदर्शक भरतीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना आपली चमक दाखवता आली.
फसवणुकीविरोधात कडक कायदे
महाराष्ट्रातील भरती प्रक्रियेत भविष्यात कोणतेही गैरप्रकार होऊ नये म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा 2024 लागू केला. या नवीन कायद्यान्वये फसवणूक करणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत तरुंगवासासह दंडाची तरतूद करण्यात आली. या प्रकारामुळे भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचाराला नक्कीच आळा बसला. केवळ पात्र उमेदवारांना सरकारी नोकऱ्या मिळू लागल्या.












Click it and Unblock the Notifications