Devendra fadnavis : 29 पैकी 'एवढ्या' मनपावर महायुतीचा विजय! CM फडणवीस काय म्हणाले? 5 मुद्द्यात भाषण
Devendra fadnavis bmc election victory speech 2026 : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. २९ पैकी २५ महापालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकत असतानाच, मुंबई महापालिकेतही स्पष्ट बहुमताचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आणि 'व्यापक हिंदुत्वा'ला दिले.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ५ प्रमुख मुद्दे
१. मुंबईत महायुतीचाच झेंडा फडकणार
"मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीला काहीसा उशीर होत असला आणि अधिकृत शिक्कामोर्तब बाकी असले, तरी कलानुसार मुंबईत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल यात शंका नाही. मुंबईच्या महापालिकेत आता महायुतीचाच झेंडा फडकणार, हे निश्चित झाले आहे." असे फडणवीस म्हणाले.
BJP writes history once again at the Municipal Corporation Election 2025-26!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 16, 2026
Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, along with the guidance of BJP National President and Hon Union Minister J. P. Nadda ji, Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah,… pic.twitter.com/FWi013ZXnp
२. विकासाच्या अजेंड्याला 'रेकॉर्ड ब्रेक' प्रतिसाद
"आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा घेऊन जनतेमध्ये गेलो होतो. ज्या प्रकारे विविध महापालिकांमध्ये 'रेकॉर्ड ब्रेक' मँडेट मिळाले आहे, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की लोकांना केवळ विकास आणि प्रामाणिकता हवी आहे. लोकांनी भाजपवर विश्वास टाकला आहे." असे फडणवीस म्हणाले.
३. पंतप्रधान मोदींवरील 'महाविश्वास' आणि बाळासाहेबांचे स्मरण
"या निकालाने हे सिद्ध केले आहे की महाराष्ट्राचा 'महाअविश्वास' केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे. या विजयाच्या निमित्ताने मी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करतो, त्यांचा आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी होता म्हणूनच आपल्याला हे यश मिळाले आहे." असे फडणवीस म्हणाले.
४. व्यापक हिंदुत्व आणि आमचा आत्मा
"हिंदुत्ववाद हा आमच्या कार्याचा आणि विचारांचा आत्मा आहे. आम्ही संकुचित नाही, तर 'व्यापक हिंदुत्व' मानणारे लोक आहोत. या भारताच्या संस्कृतीला आणि प्राचीन जीवनपद्धतीला जे आपली मानतात, त्या सर्वांचा समावेश आमच्या हिंदुत्वात आहे. हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही." असे फडणवीस म्हणाले.
५. जिंकल्यानंतर उन्माद नको, जबाबदारीने वागा
"कार्यकर्त्यांना माझे सांगणे आहे की, एवढे मोठे यश मिळाल्यावर जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. जिंकल्यानंतर कुणीही उन्माद करू नये. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शक आणि प्रामाणिकपणे कारभार करावा. पंतप्रधान मोदींनी जो विश्वास निर्माण केला आहे, तो आपल्याला सार्थ ठरवायचा आहे." असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : Pune election पुणे-पिंपरीच्या निवडणुकीत अजित पवारांचा गड का कोसळला? BJPच्या विजयाचे 5 मोठे फॅक्टर्स
हेही वाचा : BMC Election Results : मुंबईत भाजप नंबर -1; ठाकरे बंधू पराभूत का झाले, वाचा 5 मोठी कारणे
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
विश्वविजेत्या टीम इंडियावर BCCIकडून पैशांचा पाऊस! ICCपेक्षा चौपट अन् 2024च्या पेक्षाही मोठं बक्षीस! -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications