उद्घाटन पुढे ढकलले तर काहींनी छात्या बडवल्या, पण तुम्ही साधा पिलर उभारला का?- फडणवीसांचा सवाल
Devendra Fadnavis : पावसामुळे पुणे मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर टाकावे लागले. परंतु विरोधकांतील काही लोकांनी छात्या बडवल्या, नाचू लागले. पण त्यांना मला सांगायचे आहे की, आयुष्यात तुमच्या नेत्यांनी एकही विकासकाम केलं नाही. त्यांनी साधआ पोल देखील उभारला नाही, असे टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. पुणे मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझे विरोधकांना सांगणे आहे की, तुम्ही काही तरी करुण दाखवा आणि मग छात्या बडवा. पुणे मेट्रोचे काम 2014 साली या कामाला गती मिळाली. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा देशातील पहिला आहे ज्याने सर्वांत पहिले काम पूर्ण केले. पुण्याच्या वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी अजित पवार, चंद्रकांत पाटील यांनी चांगले काम केले आहे.

महात्मा फुलेंचा वारसा पुढे नेणारा कार्यक्रम
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्राला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे नेणारा हा कार्यक्रम आहे. ज्या भिडे वाड्यात मुलींची पहिला शाळा सुरू झाली तो शिक्षणांचा आणि धैर्याचा वारसा आपल्याला आठवण करुण देणारे स्मारक भिडे वाड्यात आपल्याला करुण देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पुणे मेट्रो व पायाभूत प्रकल्पांचे ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
पुण्यातील वाहतूक मॅनेज केली
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे मेट्रोचे काम 2014 मध्ये सुरू झाले. आपले सरकार आल्यावर या कामास गती मिळाली. पुणे मेट्रोसाठी कंपनी स्थापन करत वेगाने कामे सुरू झाले. देशातील सर्वात वेगाने काम पूर्ण होण्याचा मान पुणे मेट्रोच्या पहिला टप्पाला मिळाला. सर्वच पद्धतीने विचार करुन पुण्यातील वाहतूक मॅनेज करण्याचे काम या ठिकाणी झाले आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकार्पण आणि उद्घाटनासाठी पुण्यात यायचं होते पण जोरदार पावसामुळे कार्यक्रमा रद्द करावा लागला यात माझेही नुकसान झाले. कारण पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे. अशा पुण्यात येणं हे ऊर्जावान बनवणारं आहे. मी पुण्यात येऊ शकलो नाही. पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमचं दर्शन करण्याची संधी मिळाली. पुण्याची धरती महान विभूतींची आहे. महाराष्ट्राच्या विकासाची नवी साक्षीदार होत आहे. असे मोदी म्हणाले.
पुणेकरांना त्रास नको म्हणून कार्यक्रम रद्द
अजित पवार म्हणाले की, तारखेला हा कार्यक्रम होणार होता. मात्र पाऊस झाला आणि पुणेकराना त्रास होऊ नये, म्हणून कार्यक्रम रद्द करण्यात आला. विरोधकांना काही कामे राहिली नाहीत, त्यामुळे ते काही बोलत सुटले आहेत.












Click it and Unblock the Notifications