'ठाकरेंच्या इगोमुळे मेट्रोच्या कामाला ब्रेक', राहुल गांधींनी आधी शिवप्रेमींची माफी मागावी - फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. तसेच मेट्रोचे लोकार्पण झाले. या सोहळ्यात मोदींच्या आधी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला
ठाण्यात बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एमएमआर रिजनमध्ये काम हाती घेतले आहेत. आशियातील सर्वात मोठ्या लाईनचं उद्घाटन आज मोदीजी करत आहेत. नवरात्र सुरु आहे. मोदीजी 9 दिवस उपवास करतात. फक्त पाणी पितात. मेट्रो 3 ला महाविकास आघाडीने स्थगिती दिली होती. हजारो कोटी रुपये खर्च करुन स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, ही पर्यावरणाची साथ देणारी मेट्रो आहे. पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे. पण उद्धव ठाकरे यांचा इगो दुखावल्याने त्यांनी स्थगिती दिली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवीन सरकार येताच पहिल्या टप्प्याचं आम्ही या मेट्रोचं काम पूर्ण केले आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मैत्रीमुळे जपानकडून मोठी मदत
'मोदीजी तुमची आणि जपानची मैत्री यामुळे जपानच्या सरकारने मदत केली. म्हणून मेट्रो तयार होत आहे. रोज 17 लाख प्रवासी यातून प्रवास करतील. लोकांच्या जीवनात सुखाचे दिन येतील. ठाण्यात अंतर्गत रिंग मेट्रोचं ही उद्घाटन आज होत आहे. यामुळे लोकांचं जीवन सुखर होणार आहे. ठाणे आणि मुंबईत आता फक्त 20 मिनिटांचं अंतर असणार आहे. मुंबई पेक्षा तीन पट मोठी मुंबई होणार आहे. त्याची ही सुरुवात ठाण्यातून होत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
...तर राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे
राहुल गांधी कोल्हापुरला आले होते. त्यांनी ही छत्रपती शिवरायांची आठवण आली. पण त्यांना सांगू इच्छितो की, त्यांना जर शिवरायांवर बोलायचं असेल तर जवाहरलाल नेहरु यांनी शिवरायांचं अपमान करणारं पुस्तक लिहिलं आहे. आधी शिवभक्तांची माफी मागा, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.












Click it and Unblock the Notifications