काळाराम मंदिर आक्षेपार्ह पत्र प्रकरणी आरोपीला अटक, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर: नाशिकमधील काळाराम मंदिर परिसरात समाजकंटकांकडून काही पत्रक वाटण्यात आली होती. या पत्रकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता. काही विशिष्ट समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश वर्ज्य असल्याचे या पत्रकात लिहिलेले होते. दरम्यान, या प्रकरणात नाशिकमधील पंचवटी परिसरात तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पोलीसांनी अटक केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांशी बोलताना दिली. ते पत्रकारांसोबत नागपूरमध्ये बोलत होते. या पत्राच्या हेतूमागचा तपास पोलीस करत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

devendra fadanvis on kalaram temple

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आक्षेपार्ह पत्रासंदर्भात सर्व माहिती पोलिसांनी काढलेली आहे. काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आले होते. ते पत्र पब्लिश प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे.हे पत्र काढणारा व्यक्ती अनुसूचित जातीचाच आहे.

त्यामागे काय हेतू आहे याचा शोध सुरू आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हे पत्र काढले गेल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.


आरोपीच्या पाठीशी असलेल्यांचा शोध सुरू

आरोपीकडून चार मोबाईल, दोन लॅपटॉप जप्त केले असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, त्या व्यक्तीच्या पाठिशी कोण आहेत? दंगल घडवण्यासाठी त्याने हे पत्र काढले आहे का? ज्याच्या नावाने पत्र काढले, त्याच्याशी त्याचे काय वैर होते.

त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याने पत्र काढले आहे का? या सर्व बाबींची चौकशी नाशिक पोलीस करत आहे.
तसेच हे पत्र काढून पत्र सोशल मीडियावर टाकायचे आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून दंगा घडवण्याचे प्रयत्न यापुढेही होऊ शकतात. त्याकडे पूर्ण लक्ष ठेवून असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राजकीय नेत्यांनी शहानिशा करावी

या प्रकरणी विरोधकांकडून सरकारवर आरोप केले जात होते. यावर फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, काही राजकीय नेत्यांनी हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं. या प्रकारात शहानिशा न करता वस्तुस्थिती न तपासता तसे पत्र व्हायरल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल.

यामुळे राजकीय नेत्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे कान टोचले.

या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली होती. ही किड संपवा. कोण असेल त्याला बेड्या ठोका. आता निळा झेंडा घेऊनच काळाराम मंदिरात जाणार. बघू कोण रोखते ते, अशा शब्दांत आव्हाड यांनी हे पत्रक जारी करणाऱ्यांना इशारा दिला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+